IndiGo ने प्रवाशांना दिला सुखद धक्का; तिकीट दरातून हटवले Fuel Charges!
ATF खर्च भारतीय वाहकांसाठी सर्वात मोठा खर्च दर्शवितो, जे त्यांच्या एकूण महसुलाच्या सुमारे 45 टक्के खर्च करतात.
भारतामध्ये IndiGo कडून डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल प्रवासाठी तिकीट दर कमी होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. aviation turbine fuel (ATF)च्या किंमती पडल्याने आता इंडिगोने त्यांच्या विमानाच्या तिकीटात fuel charge हटवला आहे. इंडिगो ही भारतातील सर्वात मोठी एअरलाईन आहे. 5 ऑक्टोबरपासून त्यांनी तिकीटावर 1000 रूपयांपर्यंत फ्युअल सरचार्ज लावला आहे. हा चार्ज विमानाच्या अंतरावर अवलंबून आहे. ऑक्टोबर 23 मध्ये इंधनाचे दर वाढल्याने त्याचा परिणाम तिकीटदरांवरही झाला. पण आता जसे दर कमी झाले आहेत तसा त्याचा फायदा प्रवाशांनाही देण्याचा निर्णय इंडिगो ने घेतला आहे.
पहा ट्वीट
दरम्यान इंडिगो कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 4 जानेंवारी आणि नंतर जे तिकीट खरेदी करणार आहेत त्यांच्यासाठी हे दर लागू होणार आहे. जे प्रवासी 4 जानेवारी नंतर प्रवास करतील पण तिकीट आधीच काढून ठेवलं आहे त्यांना पूर्ण पैसे भरावे लागणार आहेत. त्यांच्या तिकीटातून आता सरचार्ज कमी केला जाणार नाही किंवा त्याचे रिफंड दिले जाणार नाही.
ATF खर्च भारतीय वाहकांसाठी सर्वात मोठा खर्च दर्शवितो, जे त्यांच्या एकूण महसुलाच्या सुमारे 45 टक्के खर्च करतात. इंडिगोने 500 किमी पर्यंतच्या फ्लाइटसाठी 300 रुपये आणि 501 ते 1,000 किमी दरम्यानच्या फ्लाइटसाठी 400 रुपये इंधन शुल्क आकारले होते. अशी श्रेणीबद्ध वाढ सर्व उड्डाण श्रेणींना लागू करण्यात आली आहे, ज्यात 3,501 किमी आणि त्याहून अधिक अंतर कव्हर करण्यासाठी 1,000 रुपये इंधन शुल्क आकारले जाते.