IndiGo Flight: चिखलात गाडी नाही तर चक्क विमान फसलं, आसाममधील जोरहाट येथील विचित्र घटना
इंडिगोचं विमान टेकऑफआधीच धावपट्टीवरुन घसरलं आणि किनारी असलेल्या चिखलात फसलं.
आसमच्या (Assam) जोरहटमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. तुम्ही पावसाळ्यात अनेकदा गाडी चिखलात फसल्याचं बघितल असेल किंवा त्या गाडीला धक्का देवून चिखलातून बाहेरही काढलं असेल. पण आसामध्ये चक्क इंडिगोचं (IndiGo Flight) विमान चिखलात फसल्याची विचित्र घटना घडली आहे. आसाममधील जोरहाट येथून कोलकालासाठी (Kolkata) 6E757 हे विमान उड्डाण घेणार होते. पण विमान टेकऑफआधीच (Take Off) धावपट्टीवर (Runway) घसरलं आणि किनारी असलेल्या चिखलात फसलं. विमान चिखलात बराच वेळ फसून होतं. विमान पुन्हा धावपट्टीवर नेत टेकऑफ करण्यासाठी पायलटकडून (Pilot) प्रयत्न सुरु होते. पण विमान चिखलात रुतलं होतं, सुमारे दोन तास विमान थांबवल्यानंतर हे उड्डाण अखेर रद्द करण्यात आलं.
सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवितहानी झालेली नाही. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. हे विमान धावपट्टीवरून पुन्हा परतलं. उड्डाण रद्द झाल्यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. गेल्या काही दिवसांमध्ये इंडिगोच्या अनेक विमानांचं इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करण्यात आलं आहे. तरी इंडिगोने संबंधित घटना पाहता विशेष लक्ष देण्याची गरज आहे. इंडिगो सेवेसंबंधी बरेच प्रवासी (Traveler) हल्ली सोशल मिडीयावर (Social Media) व्यक्त होताना दिसत आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये विविध विमान कंपन्यांच्या विमानांमधील तांत्रिक बिघाडाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याची दखल घेत DGCA ने या घटनांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. (हे ही वाचा:- Akasa Airlines: राकेश झुनझुनवालांची 'अकासा' आकाश प्रवासाला सज्ज, फ्लाइट तिकीट बुकींगला आजपासून सुरुवात)
गेल्या काही दिवसांपूर्वीच इंडिगोच्या अनेक विमानांचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. तांत्रिक बिघाडामुळे दोन विमानांचं पाकिस्तानमध्ये (Pakistan) इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. तरी संबंधीत प्रकार DGCA सह इंडिगो प्रशासनाने गाभिर्याने घेणं गरजेचं आहे.