IndiGo Flight: विमानात रक्तस्त्राव होऊन 60 वर्षीय व्यक्तीचा इमर्जन्सी लँडिंगनंतर मृत्यू

त्याला रक्तस्त्राव सुरु झाला. त्यामुळे विमानाचे अपत्कालीन लँडींग करण्यात आले. सदर व्यक्तीस उपचारासाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आले.

Flight Representational image. (Photo Credits: Pexels)

मदुराई येथून दिल्लीला (Madurai to Delhi) जाणाऱ्या इंडिगो (IndiGo Flight) कंपनीच्या विमानात एका 60 वर्षीय प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडली. त्याला रक्तस्त्राव सुरु झाला. त्यामुळे विमानाचे अपत्कालीन लँडींग करण्यात आले. सदर व्यक्तीस उपचारासाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आले. परंतू, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. प्रवाशाची प्रकृती विमानातच अचानक बिघडल्याचे लक्षात येताच विमान देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आली. अत्यावस्त प्रवाशाला प्रवाशाला विमानतळाजवळील रुग्णालयात नेण्यात आले. जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइट 6E-2088 मध्ये बसलेल्या अतुल गुप्ता (60) यांच्या तोंडातून रक्तस्त्राव होत होता. प्रवासादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली," असे प्रभारी संचालक प्रबोध चंद्र शर्मा यांनी सांगितले. प्ता यांना विमानतळावरून रुग्णालयात नेणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना आधीच हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता, असेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले की विमानाने 6:40 वाजता त्याच्या गंतव्यस्थानासाठी (नवी दिल्ली) उड्डाण केले. (हेही वाचा, Goa-Hyderabad SpiceJet Flight चं हैदराबाद मध्ये इमरजन्सी लॅन्डिंग; कॉकपीट मध्ये धूर)

दरम्यान, विमानात अशा घटना अनेकदा घडतात. कधी विमान हवेत असताना प्रवाशाची प्रकृती बिघडते त्यामुळे विमानाचे एमरजन्सी लँडींग करावे लागते. कधी प्रवाशी काही कारणांमुळे गोंधळ घालतात. तेव्हाही कधी कधी विमानाचे एमरजन्सी लँडींग केल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वेळा गर्भवती महिलांना प्रसुती वेदना सुरु झाल्याने आवश्यक उपचारासाठी विमान नजीकच्या विमानतळांवर उतरवावे लागते. याबाबतचे वृत्त अनेकदा प्रसारमाध्यमांतून येत असते. विमान प्रशासनही अशा घटना घडल्या तर मानवतेच्या दृष्टीने विमानांचे एमरजन्सी लँडींग करुन प्रवाशांची सुरक्षा आणि त्यांच्य आरोग्याचे रक्षण यांकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देते.