India's Richest People: सलग दहाव्या वर्षी Mukesh Ambani ठरले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; Gautam Adani यांनी दिवसाला कमावले 1,002 कोटी (Top 10 List)
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या किरकोळ आणि दूरसंचार व्यवसायातील नफ्यामुळे त्यांची निव्वळ संपत्ती वाढून 7,18,000 कोटी रुपये झाली आहे
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे सलग 10 व्या वर्षी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (Richest Indian) ठरले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या किरकोळ आणि दूरसंचार व्यवसायातील नफ्यामुळे त्यांची निव्वळ संपत्ती वाढून 7,18,000 कोटी रुपये झाली आहे. IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2021 (IIFL Wealth Hurun India Rich List) नुसार, गौतम अदानी (Gautam Adani) हे 5,05,900 कोटी रुपयांच्या संपत्तीसह या वर्षी दुसऱ्या स्थानावर आहेत. 10 वर्षांनंतरही पाच अब्जाधीशांनी टॉप 10 च्या यादीत आपले स्थान कायम ठेवले आहे. यामध्ये मुकेश अंबानी, लक्ष्मी निवास मित्तल, दिलीप सांघवी, कुमार मंगलम बिर्ला आणि शिव नादर यांचा समावेश आहे. यावर्षी चार नवीन चेहरे भारताच्या टॉप 10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामील झाले आहेत.
मुकेश अंबानी आणि कुटुंबाने एका दिवसात सुमारे 163 कोटी रुपये कमावले, तर गौतम अदानी आणि कुटुंबाने गेल्या वर्षी एका दिवसात 1002 कोटी रुपये कमावले. हूरुन इंडियाचे एमडी आणि मुख्य संशोधक अनस रेहमान जुनैद म्हणाले की, गौतम अदानी हे एकमेव भारतीय आहेत ज्यांनी एक लाख कोटी रुपयांच्या केवळ एक नव्हे तर पाच कंपन्या स्थापन केल्या आहेत. गौतम अदानीची संपत्ती एका वर्षात जवळपास 4 पट वाढली आहे. याच कारणामुळे 59 वर्षीय अदानी पुन्हा आशियातील दुसरे श्रीमंत व्यापारी बनले आहेत.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सायरस एस पूनावाला यांनी सहावे स्थान मिळवले आहे. जून 2020 मध्ये, पूनावाला यांनी पहिल्यांदाच हुरून ग्लोबल रिच लिस्टमध्ये पहिल्या 100 मध्ये स्थान मिळवले. एव्हेन्यू सुपरमार्टचे राधाकिशन दमानी IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2021 मध्ये 1,54,300 कोटी रुपयांच्या संपत्तीसह सातव्या क्रमांकावर आहेत. विनोद शांतीलाल अदानी आणि कुटुंब या वर्षी 12 व्या स्थानावरून 8 व्या स्थानावर आहेत आहेत. (हेही वाचा: Ahmedabad Crime News: गुजरातमध्ये पुर्ण पगार देत नसल्याच्या रागातून सीए पत्नीला पतीकडून बेदम मारहाण, पोलिसात तक्रार दाखल)
कुमार मंगलम बिर्ला 1,22,200 कोटी रुपयांच्या संपत्तीसह नवव्या स्थानावर आहेत. 1,21,600 कोटी रुपयांच्या संपत्तीसह जय चौधरी या यादीत दहाव्या स्थानावर आहे.