India’s GDP Growth: विद्यमान आर्थिक वर्षात भाराच्या जीडीपीमध्ये 6.2% वाढीची शक्यता, अर्थव्यवस्था गतीमान: रॉयटर्स पोल

सप्टेबर 20 ते 26 या काळात जवळपास 65 अर्थतज्ज्ञांची मते जाणून घेऊन रॉयटर्सने एक सर्व्हे केला.

Money प्रतिकात्मक फोटो (Photo Credits PTI)

विद्यमान आर्थिक वर्ष 2024 मध्ये देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) 6.2% वाढ अपेक्षीत असून येणाऱ्या काळात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल, असे निरिक्षणात्मक अनुमान रॉयटर्सच्या सर्व्हेमध्ये पुढे आले आहे. सप्टेबर 20 ते 26 या काळात जवळपास 65 अर्थतज्ज्ञांची मते जाणून घेऊन रॉयटर्सने एक सर्व्हे केला. त्यात आामी काळात 4.6% ते 7.1%. वेगाने भारतीय अर्थव्यवस्था वेग धारण करेल असे म्हटले आहे. भारताच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या विस्ताराचा मोठा प्रभाव पढेल. तसेच, ती अधिक कमी धोकादायक स्थितीकडे वाटचाल करेल असेही या अंदाजात म्हटले आहे. गेल्या तिमाहीत 7.8% च्या विस्तारानंतर, आर्थिक वाढ जुलै-सप्टेंबर तिमाहीत 6.4% पर्यंत मध्यम आणि नंतर 2024 च्या सुरुवातीला 5.5% पर्यंत कमी हऊन ऑक्टोबर-डिसेंबर कालावधीत 6.0% पर्यंत घसरेल असा अंदाज व्यक्त केला जात होता.

लाईव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, आर्थिक वर्ष 2023/2024 GDP वाढीच्या अंदाजात जोखीम नकारात्मक बाजूने कमी दिसते, असे बहुसंख्य अर्थतज्ज्ञ (36 पैकी 22) आपले मत नोंदवतात. नरेंद्र मोदी सरकारने पायाभूत सूविधांवर मोठ्या प्रमाणावर खर्च आणि गुंतवणूक केली. परिणामी त्यासाठी खर्च वाढल्याने मंदीसदृश्य वातावरण तयार झाले. मात्र, आता त्यात रोजगारनिर्मिती होऊ लागल्याने भारत मंदीसदृश्य वातावरणातून बाहेर पडण्यास मदत झाली आहे.

दरम्यान, अर्थव्यवस्थेतील वाढ असूनही संभाव्य अंदाजापेक्षा खूपच कमी आहे. ज्यामध्ये नैसर्गिक घटकांचाही मोठा प्रभाव पडतो आहे. पावसाळी हंगाम कमी होऊन कोरडे हवामान वाढल्याने 1.4 अब्ज पेक्षा जास्त लोकसंख्येच्या देशात जवळपास निम्मे लोक कर्मचारी म्हमून कार्यरत असताना त्यांना संयम ठेवावा लागेल, असेही रॉयटर्सचा अहवाल सांगतो. दरम्यान, या सर्वेक्षणात भारताचा किरकोळ महागाई दर या आर्थिक वर्षात सरासरी 5.5% आणि पुढील 4.8% असेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या4% च्या मध्यम मुदतीच्या उद्दिष्टापेक्षा जास्त असेल, असे दाखवले असताना, 34 पैकी 23 पैकी दोन तृतीयांश अर्थतज्ञांनी सांगितले की, जोखीम जास्त असेल असेल.