Coronavirus Update: भारतात कोरोना बाधितांच्या संख्येने पार केला 1 कोटींचा टप्पा, तर मृतांचा एकूण आकडा 1,45,136 वर- आरोग्य मंत्रालय

देशात कोरोना बाधितांची संख्या एक कोटींच्या पार गेली असली तरीही बरे होणा-या रुग्णांच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ होत आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

भारत कुटूंब कल्याण आणि आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, मागील 24 तासांत देशात 25,153 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 1 कोटींच्या (COVID-19 Total Cases) पार गेली आहे. तर कोरोना बाधित मृतांची एकूण संख्या 1 लाख 45 हजार 136 वर (COVID-19 Death Cases) पोहोचली आहे. आतापर्यंत 95 लाख 50 हजार 712 (COVID-19 Recovered Cases) लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आह. त्याचबरोबर सद्य घडीला देशात 3 लाख 8 हजार 751 (COVID-19 Active Cases) रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात कोरोना बाधितांची संख्या एक कोटींच्या पार गेली असली तरीही बरे होणा-या रुग्णांच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ होत आहे.

केंद्र सरकार लसीकरण मोहिमेची (Vaccination Drive) तयारी करत असताना 50% हून अधिक भारतीय कोविड-19 ची लस (Covid-19 Vaccine) घेण्याबाबत चिंता दर्शवली आहे, असे एका सर्वेक्षणातून समोर आले. कोविड-19 मुळे संपूर्ण जग त्रासून गेले होते. परंतु, नुकतीच लसींना मंजूरी मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सर्व नागरिकांना लवकरात लवकर लस दिली जावी यासाठी लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु आहे. कमी काळात आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उत्पादनामुळे लसीच्या क्षमतेवर आणि सुरक्षिततेवर काही प्रश्न उभे राहत आहेत. या अशा काळात लसीबद्दलचा सर्व्हे खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.हेदेखील वाचा- COVID-19 Vaccination in India Guidelines: भारतामध्ये कोरोना वायरस लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी भारतीयांना मिळणार लस; गाईडलाईन्स जारी

जगातील 8 कोविड-19 लसींपैकी 3 लसी या विकासाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये अॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने बनवलेली कोविशिल्ड, भारत बायोटेकची Covaxin, Zydus Cadila विकसित ZyCoV-D, रशियाने विकसित केलेली Sputnik-V, SII ने विकसित केलेली NVX-CoV2373 आणि Geneva ने विकसित केलेली HGCO19 यांचा समावेश आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif