Coronavirus in India: भारतात कोविड-19 रुग्णांच्या संख्येने पार केला 7 लाखांचा टप्पा; तर मृतांचा आकडा 20 हजारांच्या पार

महाराष्ट्रात आतापर्यंत 2,11,987 रुग्ण आढळले आहेत.

Coronavirus | (Photo Credits: Pixabay.com)

भारतात कोरोना व्हायरसने (Coronavirus) अक्षरश: हाहाकार माजविला असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना बाधितांच्या संख्येने 7 लाखांचा टप्पा पार केला आहे. मागील 24 तासांत देशात 22,252 नवे रुग्ण आढळले असून देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 7 लाख 19 हजार 665 वर पोहोचली आहे. यात सद्य घडीला देशात 2,59,557 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्या 24 तासांत 467 रुग्ण दगावले असून मृतांची एकूण संख्या 20,160 वर पोहोचली आहे. काल (6 जुलै) दिवसभरात 16,515 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत 4,39,948 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

भारतात (India) सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात असून त्यापाठोपाठ तमिळनाडू (Tamil Nadu), नवी दिल्ली (Navi Delhi), गुजरात (Gujrat) मध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 2,11,987 रुग्ण आढळले आहेत. Coronavirus: कोरोना व्हायरस रुग्णांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या स्थानावर; रशियाला टाकले मागे, लवकरच पार करणार 7 लाख रुग्णांचा टप्पा

तमिळनाडू मध्ये आतापर्यंत 1,14,978 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. जगातील कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत सध्या तिसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. याबाबतीत रविवारी भारताने रशियाला (Russia) मागे टाकले आहे. सध्याच्या घडीला जगात सर्वाधिक कोरोना संसर्गाची प्रकरणे अमेरिकेत (US) आहेत. जगातील महासत्ता असलेल्या या देशात 29 लाखाहून अधिक प्रकरणे आहेत. अमेरिकानंतर ब्राझील (Brazil), भारत आणि रशियाचा नंबर लागतो.