Coronavirus In India:भारतामध्ये मागील 24 तासांत 89,706 नव्या कोविड 19 रूग्णांची भर; एकूण बाधितांची संख्या 43 लाखांच्या पार
मागील 24 तासांत सुमारे 89,706 नव्या कोविड 19 रूग्णांची भर पडली आहे तर 1,115 जणांचा मृत्यू ओढावला आहे.
भारतामध्ये दिवसागणिक कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फैलाव पुन्हा वेगाने होण्यास सुरूवात झाली आहे. आज (9 सप्टेंबर) केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनिसार देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 43 लाखांच्या पार गेला आहे. मागील 24 तासांत सुमारे 89,706 नव्या कोविड 19 रूग्णांची भर पडली आहे तर 1,115 जणांचा मृत्यू ओढावला आहे. मागील सहा महिन्यांपासून भारत कोरोना व्हायरस फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. रूग्ण संख्या झपाट्याने वाढत असली तरीही त्याच्या तुलनेत आजारावर मात करणार्यांची संख्या चांगली असल्याने हा एक दिलासा आहे.
ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात 5,18,04,677 एकूण सॅम्पलची चाचणी झाली आहे. तर काल एका दिवसात 11,54,549 नमूने कोविड 19 साठी तपासण्यात आले आहेत. सध्या देशामध्ये 8,97,394 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 43,70,129 एकूण कोरोनाबाधितांपैकी आतापर्यंत 33,98,845 जणांनी मात केली आहे. 73,890 जणांची कोरोना व्हायरस विरूद्धची लढाई अयशस्वी ठरली आहे.
ANI Tweet
महाराष्ट्रामध्येही कोरोना व्हायरस बाबत चिंताजनक स्थिती आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 2 लाखापेक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. तर मुंबईमध्येही मागील काही दिवसांत रूग्णसंख्या वाढल्याने रूग्णवाढीचा दर वाढला आहे.