Indian Stocks Markets Bloodbath: जागतिक अर्थकारणाचा फटका, भारतीय शेअर बाजार धक्क्याला, सेन्सेक्स 1250 अंकांनी आपटला, निफ्टीची 17,200 वर दमछाक

बाजार सुरु झाल्यावर काही वेळातच सेन्सेक्स 1250 अंकांनी (Bombay Stock Exchange) गडगडला तर निफ्टी 17,200 अंकांवरच (National Stock Exchange) दमछाक होताना पाहायला मिळाला

Representational Image (Credits: Wikimedia Commons)

आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या आर्थिक घडामोडींचा मोठा प्रभाव आज भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळाला. भारतीय शेअर बाजार (Indian Stocks Markets) आज आठवड्याच्या सुरुवातीस जोरदार आपटला. बाजार सुरु झाल्यावर काही वेळातच सेन्सेक्स 1250 अंकांनी (Bombay Stock Exchange) गडगडला तर निफ्टी 17,200 अंकांवरच (National Stock Exchange) दमछाक होताना पाहायला मिळाला. आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या घडामोडींचा परिणाम आठवड्याच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी लक्ष्यनियपणे पाहायला मिळाला.

शेअर बाजारातील घसरणीबाबत महत्त्वपूर्ण घडामोड अशी की, आजच्या पडझडीचा मोठा फटका सर्वच क्षेत्रातील सर्व प्रकारच्या कंपन्यांना बसताना पाहायला मिळाला. म्हणजेच, स्मॉल, मिड आणि लार्ज कॅप अशा सर्वच कंपन्यांचे समभाग मोठ्य प्रमाणावर घसरताना पाहायला मिळाले. त्यामुळे सहाजिकच आजच्या पडझडीचा फटका सर्वच प्रकारच्या गुंतवणूकदारांना बसला. त्यामुळे आतापर्यंत बाजारातील गुंतवणूकदारांचे सुमारे 5.50 लाख रुपये बुडाल्याचे चं फायनॅनशिएल एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटले आहे. (हेही वाचा, Post Office Senior Citizen Saving Scheme: पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना, जाणून घ्या व्याजदर आणि कसा करावा अर्ज)

फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले की, वाढत्या महागाईविरुद्धच्या लढ्यात अमेरिकेची मध्यवर्ती बँक मागे हटणार नाही. जेरेम पॉवले यांच्या प्रतिक्रियेनंतर अमेरिकेच्या शेअरबाजारात मोठी हालचालल झाली. त्याचा फटका भारतीय शेअर बाजार घसरण्यावर झाला. बाजार सुरु झाला तेव्हा सकाळी 9.19 वाजता, सेन्सेक्स 1,309.60 अंक म्हणजेच 2.23 टक्क्यांनी घसरून 57,524.27 टक्क्यांवर, तर निफ्टी 377.00 अंकांनी म्हणजेच2.15 टक्क्यांनी घसरून 17,181.90 अंकांवर पोहोचला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार सर्व निफ्टी 50 ने आज बाजार सुरु झाल्यापासूनच लाल रंग अनुभवला.

दरम्यान, पॉवेल यांनी जॅक्सन होल, वायोमिंग येथील सेंट्रल बँकिंग कॉन्फरन्समध्ये दिलेल्या भाषणात म्हटले की, चलनवाढ नियंत्रणात येण्यापूर्वी अमेरिकन अर्थव्यवस्थेला "काही काळासाठी" कडक आर्थिक धोरणाची आवश्यकता असेल. त्यामुळे आवश्यकतेनुसार कडक कारवाई केली जाईल. फेडरल ओपन मार्केट कमिटीचे (FOMC) आगामी काळातील लक्ष हे महागाई दर 2 टक्क्यांपर्यंत खाली आणणे हा आहे.

पॉवेल यांनी पुढे म्हटले की, महागाई कमी करण्‍यासाठी शाश्वत काळासाठी फारच कमी ड्रेंड पाहायला मिळेल. त्यामुळे बाजारातील स्थिती काही काळासाठी अत्यंत नाजूक असेल. पण उच्च व्याजदर, मंद वाढ आणि मवाळ कामगार बाजार धोरण आदि परिस्थितीमुळे महागाई कमी होईल. गृहकर्जधारक आणि व्यावसायिकांनाही या काळात काहीसे वेदनादाई अनुभवांना सामोरे जावे लागू शकते, असेही पॉवले यांनी म्हटले.