Indian Stock Market: भारतीय शेअर बाजार सकारात्मक: सेन्सेक्स, निफ्टी-50 मध्ये वधार, जाणून घ्या ट्रेंडींग स्टॉक्स

जागतिक बाजारातील दबाव असूनही बुधवारी भारतीय शेअर बाजारांची सुरुवात सकारात्मक झाली. निफ्टी 50 आणि सेन्सेक्समध्ये वाढ झाली, तर गुंतवणूकदार अमेरिकन व्यापार धोरणांबद्दल सावध राहिले. परिणामी बाजार सकारात्मक असला तरी तो संथच दिसला.

Indian Stock Market | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Stock Market Update: जागतिक बाजारातील (Global Stocks Market) अस्थिरतेला न जुमानता भारतीय शेअर बाजारांनी (Indian Stock Market) बुधवारी (12 मार्च) सकारात्मक सुरुवात केली. निफ्टी 50 (Nifty 50) निर्देशांक 22,536 वर उघडला, 38.45 अंकांनी (0.17%) वाढला, तर बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 74,270.81 वर सुरू झाला,168.49 अंकांनी (0.23%) वाढला. असे असले तरी, अमेरिकी बाजाराचा (US Markets) भारतीय शेअर बाजारावर मोठा परिणाम पाहायला मिळाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दिलेल्या आश्वासनामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर असा, परिणाम झाला की अमेरिकेत मंदीचा कोणताही धोका नाही. त्यांच्या विधानामुळे अमेरिकन बाजारांना तोटा भरून काढण्यास मदत झाली, ज्यामुळे गुंतवणूकदारांना काही दिलासा मिळाला. तथापि, आर्थिक अनिश्चितता आणि व्यापार धोरणांमुळे एकूण बाजाराच्या दिशेबद्दल गुंतवणुकदार सावध आहेत.

बाजाराची स्थिती आणि गुंतवणुकदारांचे वर्तन

बाजाराची स्थिती पाहून गुंतवणुकदार बचावात्मक आणि सावधानतेचे धोरण स्वीकारत आहेत. त्याुमळे गुंतवणूकदारांचे वर्तनही काहीसे संभ्रमीत पाहायला मिळाले. तज्ज्ञांनी गुतंवणुकदारांचे वर्तन सांगताना खालील निरिक्षणे नोंदवली.

  1. अतिरिक्त रोख राखीव ठेवणे.
  2. अतिमूल्यित समभागांमध्ये गुंतवणूक कमी करणे.
  3. ट्रम्पच्या व्यापार धोरणांशी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणे.

ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे शेअर बाजार आश्वस्त

बँकिंग आणि बाजार तज्ञ अजय बग्गा, एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले: डोनाल्ड ट्रम्पच्या विधानानंतर बाजार काहीसे आश्वस्त झाले, ज्यामुळे तेजी आली. पोर्टफोलिओ व्यवस्थापक तरलता राखून, अतिमूल्यित समभागांमध्ये एक्सपोजर कमी करून आणि ट्रम्प टॅरिफ जोखीम टाळण्यासाठी विविधीकरण करून अनिश्चिततेचे व्यवस्थापन करत आहेत. त्यांच्या पहिल्या कार्यकाळापेक्षा, ट्रम्प 2.0 बाजारातील चढउतारांना अधिक सहनशील दिसते.

सुरक्षित गुंतवणुकीकडे गुतणुकदारांचा ओढा

अमेरिकन मनी मार्केट फंडांच्या वाढीमध्ये गुंतवणूकदारांची सावधगिरी दिसून येते, ज्यांनी आता व्यवस्थापनाखालील मालमत्तेत USD 7 ट्रिलियन ओलांडली आहे. हे सुरक्षित गुंतवणुकीकडे वळण्याचे संकेत देते जसे की:

  • सोने आणि चांदी
  • अल्पकालीन यूएस ट्रेझरी
  • तज्ञांचा असा विश्वास आहे की जागतिक व्यापार अनिश्चितता आणि आर्थिक धोरणातील बदलांना तोंड देताना, संयम हा गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम धोरण आहे.

भारतीय बाजारातील कामगिरी आणि क्षेत्रीय ट्रेंड

शेअर बाजारातील ठळक मुद्दे:

  1. निफ्टीमधील 50 पैकी 32 समभाग हिरव्या रंगात उघडले, तर 16 समभाग घसरले
  2. निफ्टी आयटी क्षेत्रातील शेअर्स 1.14% ने घसरले, जे अमेरिकन बाजारातील कमकुवत भावना दर्शवते.

दरम्यान, अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख अक्षय चिंचलकर म्हणाले: सुरुवातीच्या घसरणीतून निफ्टीची रिकव्हरी तेजीची ताकद दर्शवते. 22,677 वरील ब्रेकआउट निर्देशांक 22,720-22798 पर्यंत नेऊ शकतो, तर आधार 22,245 वर आहे. जर तो याच्या खाली आला तर 22,117 वरील गंभीर आधाराची चाचणी घेतली जाऊ शकते.

आशियाई बाजारातील कामगिरी

  1. तैवानचा भारित निर्देशांक: +1.43%
  2. दक्षिण कोरियाचा KOSPI: +1.47%
  3. इंडोनेशियाचा जकार्ता कंपोझिट: +1.24%
  4. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक: -0.13%

जागतिक बाजारपेठा अनिश्चिततेचा सामना करत असताना, भारतीय गुंतवणूकदार अस्थिरतेतून मार्ग काढण्यासाठी आर्थिक ट्रेंड आणि भू-राजकीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, गुंतवणूकदार सावधगिरी बाळगत असल्याने बाजारात वधार असला तरी, तो संथ गतीने व्यवहार करत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement