भारतीयांना लवकरच मिळणार Chip Based E-Passports, काय असतील या नव्या पासपोर्टची वैशिष्ट्य

भारतीयांना लवकरच चीप बेस्ड ई पासपोर्ट (chip-based e-passports) मिळणार असल्याची घोषणा नरेद्र मोदींनी केली आहे.

Chip-Based E-Passport (Photo credits: Twitter)

15th Pravasi Bharatiya Diwas: आज वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जात आहे. येथील आयोजित उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये नरेद्र मोदींनी (PM Narendra Modi) भारतीयांना लवकरच चीप बेस्ड ई पासपोर्ट (chip-based e-passports) मिळणार असल्याची घोषणा केली आहे. लवकरच भारतीयांसाठी ही सोय खुली केली जाणार असून त्याचा फायदा देशा-परदेशातील करोडो भारतीयांना होणार असून त्यासंबंधी काम सुरू असल्याची माहिती मोदींनी दिली आहे.

जगभरातील एम्बेसी आणि काऊन्स्लेट्स पासपोर्ट सेवा प्रोजेक्टखाली जोडले जाणार आहेत. पासपोर्ट सर्विससोबत सेंट्रलाईज्ड सिस्टीम जोडली जाणार आहे. लवकरच ही सेवा मिळणार असल्याची माहिती आज प्रवासी भारतीय दिवसच्या कार्यक्रमामध्ये बोलताना दिली आहे.चीप बेस्ड ई पासपोर्टमुळे परदेशात स्थायिक झालेले भारतीय आणि मूळ भारतीय अशा डाटा ठेवणं आणि त्यांना व्हिसा देणं ही प्रक्रिया सुलभ होणार आहे.

E- Passport ची खास वैशिष्ट्यं -:

ई पासपोर्टमध्ये एक चीप लावलेली असेल. या चीपमध्ये पासपोर्ट अधिकार्‍याची डिजिटल सिग्नेचर असेल त्यासोबत पासपोर्ट धारकाचं नाव, बर्थ डेट, डिजिटल फोटो आणि फिंगर प्रिंट असेल. हा सुरक्षित पासपोर्ट असेल. यामुळे त्याची छेडछाड होण्याची शक्यता कमी असेल. यामुळे विमानतळावर सिक्युरिटी व्हेरिफिकेशनसाठी लागणारा वेळ देखील वाचणार आहे.

2019 मधील जगातील पॉवरफूल पासपोर्टच्या यादीमध्ये भारतीय पासपोर्ट 79 व्य स्थानी आहे. यंदा जपानचा पासपोर्ट अव्वलस्थानी आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif