भारतीय रेल्वेने प्रसिद्ध केली 1 जून पासून धावणाऱ्या 200 गाड्यांची यादी; कर्नाटकमध्ये सुरु होणार राज्यांतर्गत Train Service, जाणून घ्या प्रवासाचे नियम

भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे (Indian Railways) 200 प्रवासी रेल्वे (Passenger Train) सेवांचे काम सुरू करणार आहे. या गाड्या 1 जूनपासून सुरू होतील आणि या सर्व गाड्यांचे बुकिंग 21 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार

Shramik Special Trains |(Photo Credits: PTI)

भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे  (Indian Railways) 200 प्रवासी रेल्वे (Passenger Train) सेवांचे काम सुरू करणार आहे. या गाड्या 1 जूनपासून सुरू होतील आणि या सर्व गाड्यांचे बुकिंग 21 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार. रेल्वेने या 200 गाड्यांची माहितीही जाहीर केली आहे. यामध्ये मुख्यःतो जनशताब्दी, दुरांतो, उद्यान एक्प्रेस, साबरमती एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. यासह दक्षिण पश्चिम रेल्वेने (South Western Railway) 22 मे 2020 पासून केएसआर बेंगलुरू (KSR Bengaluru) ते बेलगावी (Belagavi) दरम्यान आणि दुसरी केएसआर बेंगलुरू ते म्हैसूर (Mysuru) यांच्या दरम्यान दोन राज्यांतर्गत विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

एएनआय ट्वीट -

केएसआर बेंगलुरू – बेलागावी – केएसआर बेंगलुरू ही ट्राय साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस 22 मे पासून दर सोमवारी, बुधवार आणि शुक्रवारी सुटेल. तर केएसआर बेंगलुरू – म्हैसूर – केएसआर बेंगलुरु स्पेशल (आठवड्यातून 6 दिवस) 22 मे पासून रविवार वगळता इतर सर्व दिवस सुटेल. सीपीआरओ दक्षिण पश्चिम रेल्वे, हुबळी यांनी ही माहिती दिली. आयआरसीटीसी पोर्टलमार्फत या गाड्यांचे बुकिंग ऑनलाईनही केले जाईल. कोरोना विषाणूचा लॉकडाउन सुरू झाल्यानंतर प्रथमच रेल्वे राज्यांतर्गत रेल्वे सेवा सुरू करणार आहे. यासह लॉक डाऊनमुळे विविध राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी नेण्यासाठी रेल्वे विशेष गाड्या चालवित आहेत.

भारतीय रेल्वे बोर्डाने स्टेशन्सवर केटरिंग, फूड प्लाझा, रीफ्रेशमेंट (टेकवे) उघडण्यास परवानगी दिली आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन आणि विभागीय रेल्वेला आज पाठविलेल्या पत्रात ही माहिती रेल्वे बोर्डाने दिली आहे. रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सबरोबरच बुक स्टॉल्स, मिनी-केमिस्ट शॉप्स आणि विविध व क्यूरियो दुकानेही उघडली जातील. दरम्यान, रेल्वेने दररोज 200 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेऊन विशेषत: देशातील छोट्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना मोठा दिलासा दिला आहे. मंगळवारी रेल्वेने ही घोषणा केली. (हेही वाचा: 25 मेपासून सुरु होणार देशांतर्गत उड्डाणे; सर्व विमानतळांना सज्ज राहण्याचा Aviation Ministry चा आदेश)

या दोन्ही एसी, नॉन-एसी वर्ग असलेल्या पूर्णपणे राखीव गाड्या असतील; जनरल कोचमध्येही बसण्यासाठी राखीव जागा असेल. यामध्ये केवळ ऑनलाइन तिकिटे बुक करणाऱ्या लोकांनाच परवानगी असेल. या गाड्यांचा आगाऊ आरक्षण कालावधी जास्तीत जास्त 30 दिवस असेल. या गाड्यांसाठी आरएसी, वेटिंगलिस्ट तयार केली जाईल, पण प्रतीक्षा यादी तिकीटधारकांना या गाड्यांमध्ये चढण्यास परवानगी नसेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now