Indian Railways: आता व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन मागवता येणार खाद्यपदार्थ; भारतीय रेल्वेने सुरू केली नवी सेवा, जाणून घ्या नंबर
ई-खानपान सेवा अधिक ग्राहक-केंद्रित बनवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत, भारतीय रेल्वेने अलीकडेच रेल्वे प्रवाशांसाठी ई-खानपान सेवेच्या माध्यमातून खाद्यपदार्थ मागविण्यासाठी व्हॉट्सअॅप संपर्क सुरू केला आहे.
भारतीय रेल्वेचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ मर्यादितने (IRCTC) विकसित केलेल्या विशेष www.catering.irctc.co.in या संकेतस्थळाच्या तसेच ई-कॅटरिंग अॅप फूड ऑन ट्रॅकच्या माध्यमातून ई-खानपान सेवा सुरू केली आहे. ई-खानपान सेवा अधिक ग्राहक-केंद्रित बनवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत, भारतीय रेल्वेने अलीकडेच रेल्वे प्रवाशांसाठी ई-खानपान सेवेच्या माध्यमातून खाद्यपदार्थ मागविण्यासाठी व्हॉट्सअॅप संपर्क सुरू केला आहे. यासाठी बिझनेस व्हॉट्सअॅप क्रमांक +91-8750001323 सुरू करण्यात आला आहे.
सुरुवातीला, व्हॉट्सअॅप संपर्कांद्वारे ई-खानपान सेवांची दोन टप्प्यांत अंमलबजावणी करण्याची योजना आखण्यात आली. पहिल्या टप्प्यात www.ecatering.irctc.co.in या दुव्यावर क्लिक केल्यानंतर ई-कॅटरिंग सेवा निवडण्यासाठी ई-तिकीट बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना बिझनेस व्हॉट्सअॅप नंबर संदेश पाठवला जाईल.
या पर्यायासह, ग्राहकांना अॅप डाउनलोड न करताही थेट आयआरसीटीसीच्या ई-खानपान संकेतस्थळाच्या माध्यमातून रेल्वेस्थानकाच्या मार्गावर उपलब्ध असलेल्या त्यांच्या पसंतीच्या रेस्टॉरंटमधून त्यांच्या आवडीच्या खाद्यपदार्थांची मागणी त्यांना नोंदवता येईल. (हेही वाचा: एअर विस्तारा विमान कंपनीकडून 70 लाख रुपयांचा दंड वसूल; अनिवार्य उड्डाणे न केल्याबद्दल डीजीसीएकडून दणका)
सुरुवातीला, निवडक रेल्वेगाड्या आणि प्रवाशांच्या ई-खानपान सेवेसाठी व्हाट्स अप संपर्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि ग्राहकांचे अभिप्राय आणि सूचनांच्या आधारे, रेल्वे इतर गाड्यांमध्येही ही सुविधा सुरु करेल. आज, ग्राहकांना दर दिवशी अंदाजे 50000 भोजनाची मागणी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तसेच अॅपद्वारे उपलब्ध करून दिलेल्या ई-खानपान सेवांद्वारे पूर्ण केली जात आहे.