Indian Railway: नवीन वर्षात रेल्वे तिकिट दरात वाढ होण्याची शक्यता; प्रवाशांच्या खिशाला बसणार चाप
कारण नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतीय रेल्वेच्या सर्व तिकीट दरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रेल्वे प्रवाशांच्या खिशाला चाप बसण्याची शक्यता आहे. कारण नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतीय रेल्वेच्या सर्व तिकीट दरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या आठवडाभरात नव्या दरवाढीबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रेल्वेच्या तिकीटांची दरवाढ प्रति किलोमीटर 5 पैसे ते 40 पैशांपर्यंत वाढवलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने नवीन वर्षात प्रवाशांना थोडी निराशाजनक बातमी देणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रेल्वेच्या एसी कोचपासून जनरल कोचपर्यंत सर्व कोचच्या तिकीटांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. यात मासिक आणि त्रैमासिक पासाचाही समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वेच्या बोर्डने नवीन तिकीट दराचा तक्ता तयार केला आहे. या नवीन तिकीट दरानुसार रेल्वेला दरवर्षी 4 ते 5 कोटी रुपयांची अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.
हेदेखील वाचा- रेल्वे तिकीट आरक्षणासाठी नियमात बदल, जाणून घ्या कोणत्या गोष्टीसाठी किती रुपये स्विकारणार
रेल्वे तिकिट दरवाढीसाठी गेल्या महिन्यातच पंतप्रधान कार्यालयातून मंजूरी देण्यात आली होती. मात्र झारखंड विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ रोखण्यात आली होती असे सांगण्यात येत आहे.
रेल्वेच्या बोर्डने नवीन तिकीट दराचा तक्ता तयार केला आहे. या नवीन तिकीट दरानुसार रेल्वेला दरवर्षी 4 ते 5 कोटी रुपयांची अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.