'MV Lila Norfolk' Cargo Ship Hijacked: सोमालियाच्या किनारपट्टीवर 15 भारतीय कर्मचारी असलेले जहाज हायजॅक; Indian Navy ची मदत सुरू
सध्या इंडियन नेव्ही एअरक्राफ्ट या जहाजाच्या संपर्कामध्ये आहे. जहाजावरील भारतीय कर्मचार्यांशी संपर्क साधण्यात त्यांना यश आलं आहे.
सोमालियाच्या किनारपट्टी वर 'MV Lila Norfolk'हे कार्गो जहाज हायजॅक झाले आहे. सध्या इंडियन नेव्ही या जहाजाला जवळून मॉनिटर करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या जहाजावर 15 भारतीय कर्मचारी देखील अडकले आहे. दरम्यान या जहाजाच्या हायजॅकची माहिती गुरूवारी देण्यात आली आहे. सध्या इंडियन नेव्ही एअरक्राफ्ट या जहाजाच्या संपर्कामध्ये आहे. जहाजावरील भारतीय कर्मचार्यांशी संपर्क साधण्यात त्यांना यश आलं आहे.
Marine Traffic च्या माहितीनुसार, हे जहाज ब्राझीलच्या Porto du Acu कडून बहरिनच्या Khalifa bin Salman Port कडे निघाले होते. 11 जानेवारीला ते पोहचणं अपेक्षित होतं. या जहाजावरून शेवटचा नियमित संपर्क हा 30 डिसेंबरला झाला होता. भारताकडून सध्या INS Chennai या जहाजाच्या मदतीला गेले आहे.
व्यापारी/मालवाहू जहाजांच्या अपहरणाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, भारत गेल्या काही दिवसांपासून - विशेषत: Gulf of Aden आणि North Arabian Sea या प्रदेशातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. त्यामुळे परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी या भागात आयएनएस चेन्नई तैनात केलेली होती.
भारतीय नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे की, अरबी समुद्रात लायबेरिया-ध्वज असलेल्या बल्क कॅरिअरवर अपहरणाच्या प्रयत्नात झालेल्या एका सागरी घटनेला त्यांनी तात्काळ प्रतिसाद दिला आहे. "04 जानेवारी 24 रोजी संध्याकाळी सुमारे पाच ते सहा अज्ञात सशस्त्र कर्मचार्यांद्वारे जहाजाने UKMTO पोर्टलवर एक संदेश पाठवला होता," असे निवेदनात म्हटले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)