धक्कादायक! पाच वर्षांमध्ये 7 क्षेत्रातील तब्बल 3.64 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या , टेक्साईल सेक्टर अव्वल क्रमांकावर, पाहा कोणत्या क्षेत्राला किती धक्का
आर्थिक क्षेत्रामध्ये निर्माण झालेले मंदीचे वातावरण आणि सुस्ती दूर करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. या प्रयत्नाचा भाग म्हणून अर्थसंकल्प 2020 मध्ये अनेक घोषणा केल्या जाऊ शकतात. त्याला किती यश येते हे पाहावे लागणार आहे.
Indian Economic Slowdown and Unemployment: देशात मंदी नाही सध्या केवळ मंदीसदृश्य वातावरण आहे. असे असले तरी या वातावरणात गेल्या पाच वर्षांमध्ये एकूण सात क्षेत्रांमध्ये अवघ्या 7 सेक्टरमध्ये तब्बल 3.64 कोटी लोकांच्या नेकऱ्या गेल्या आहेत. दै. भास्करने आपल्या वृत्तात हा दावा केला आहे. या वृत्तात म्हटले आहे की, या दैनिकाने देशभरातील विविध तज्ज्ञ, अभ्यासक आणि काही इंडस्ट्री बॉडी आणि सरकारी आकडेवारी यांच्या अभ्यास करुन देशातील नोकरदार वर्ग आणि त्यांच्या नोकऱ्यांची सध्यास्थिती काय आहे याबाबत जाणून घेतले. अभ्यासमध्ये निष्कर्ष असा आला की, गेल्या पाच वर्षांमध्ये केवळ 7 सेक्टर्समध्ये तब्बल 3.64 कोटी लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. बँकिंग (Banking), फायनान्स, ऑटो इंडस्ट्री (Auto), टेक्सटाइल (Textile), विमानउद्योग, ज्वेलरी ( Jewelry) अशी या सेक्टर्सची नावे आहेत. यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरुपातील रोजगार आणि नोकऱ्यांचा समावेश आहे. या अहवालानुसार सर्वाधिक फटका बसला तो टेक्सटाईल सेक्टरला. या सेक्टरमध्ये नोकऱ्या जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
येत्या 1 फेब्रुवारी 2020 या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये निर्माण झालेले मंदीचे वातावरण आणि सुस्ती दूर करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. या प्रयत्नाचा भाग म्हणून अर्थसंकल्प 2020 मध्ये अनेक घोषणा केल्या जाऊ शकतात. त्याला किती यश येते हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, एका अहवालानुसार सरकारी प्रयत्न आणि जीडीपी वाढीचा दर याबाबतचा आशावाद पाहिला तर येत्या काही काळात नवे रोजगार निर्माण होऊही शकतील. हे रोजगार येत्या 5 वर्षांमध्ये निर्माण होण्याची संभावना असून, त्याची संख्या 5.3 इतकी असू शकते. परंतू, आणखी एका अहवालानुसार देशातील बेरोजगारीचे प्रमाण तब्बल 7.1 टक्क्याच्याही वर पोहोचले आहे. त्यामुळे वाढती बेरोजगारी सरकारसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. (हेही वाचा, Effects Of Demonetisation: नोटबंदी निर्णयाच्या तडाख्यात 50 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या - अहवाल)
कोणत्या क्षेत्रात नोकऱ्या जाण्याचे प्रमाण किती?
कोणत्या क्षेत्रात किती नोकऱ्या गेल्या? प्रमाण आणि कथीत कारणं | ||
सेक्टरचे नाव | नोकीर गेलेल्यांची संख्या | कारण (कथीत) |
टेक्स्टाईल | 3.5 कोटी | जागतिक मंदी, उत्पादन खर्च वाढ, बांग्लादेशात स्वस्त रोजगार निर्मिती |
ज्वेलरी (रत्न, सोने, चांदी) | 5 लाख | वाढता सोने दर, आयातिवर वाढलेली कस्टम ड्यूटी, विदेशात सोने खरेदीचा ट्रेंड |
ऑटो | 2.30 लाख | BS-6 वाहनांमध्ये वाढ, ऑटोमेनशन पडझड |
बँकिंग | 3.15 लाख | सरकारी बँकांचे विलिनीकरण |
रिअल इस्टेट | 2.7 लाख | नोंटबंदी, जीएसटी |
एविएशन | 20 हजार | जेट एअरवेज किंगफिशर बंद झाल्याने मोठा फटका |
भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, क्लोदिंग मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इंडिया चे प्रमुख राहुल मेहता यांनी म्हटले आहे की, टेक्सटाईल सेक्टरमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे तब्बल 3.5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अर्थात आता स्थिती काहीशी सुधारु लागली आहे. या क्षेत्रात येत्या पाच वर्षांमध्ये पुन्हा नोकऱ्या वाढण्याची शक्यता आहे. नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार सांगतात की, देशात 'जॉब लेस' अशी संकल्पना नाही. नोकऱ्यांच्या निर्मितीचे प्रमाण काहीसे कमी आहे हे खरे आहे. परंतू, केंद्र सरकारने इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च वाढवला आहे. त्यामुळे सहाजिकच गुंतवणुकही वाढेन तसेच, नोकऱ्याही निर्माण होतील.