MiG-29 Fighter Jet Crashes: भारतीय हवाई दलाचे मिग-29 लढाऊ विमान कोसळले; राजस्थानच्या बाडमेरमध्ये प्रशिक्षणादरम्यान अपघात
भारतीय हवाई दलाचे (Indian Air Force) मिग-29 (MiG-29 Crash) हे लढाऊ विमान सोमवारी (2 ऑगस्ट) रात्री राजस्थानमधील (Rajasthan) बाडमेरजवळ (Barmer) नियमित प्रशिक्षण सराव (AF Training Exercise) दरम्यान कोसळले. विमानात एक गंभीर तांत्रिक समस्या निर्माण झाली. ज्यामुळे या विमानास अपघात (Fighter Jet Accident) झाला.
भारतीय हवाई दलाचे (Indian Air Force) मिग-29 (MiG-29 Crash) हे लढाऊ विमान सोमवारी (2 ऑगस्ट) रात्री राजस्थानमधील (Rajasthan) बाडमेरजवळ (Barmer) नियमित प्रशिक्षण सराव (AF Training Exercise) दरम्यान कोसळले. विमानात एक गंभीर तांत्रिक समस्या निर्माण झाली. ज्यामुळे या विमानास अपघात (Fighter Jet Accident) झाला. विमानातील पायलट बचावला आहे मात्र त्याला गंंभीर दुखापत झाल्याचे समजते. त्याला कोसळलेल्य विमानातून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही.
प्रशिक्षण मोहिमेदरम्यान विमानास अपघात
प्राप्त माहितीनुसार, ही घटना बाडमेर सेक्टरमध्ये रात्रीच्या प्रशिक्षण मोहिमेदरम्यान घडली. हा प्रदेश IAF द्वारे हवाई सरावासाठी वारंवार वापरला जातो. X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केलेल्या भारतीय वायुसेनेच्या अधिकृत निवेदनाननुसार, "बाडमेर सेक्टरमध्ये नियमित रात्रीच्या प्रशिक्षण मोहिमेदरम्यान, IAF मिग-29 मध्ये एक गंभीर तांत्रिक अडचण आली. ज्यामुळे वैमानिकाला बाहेर काढण्यास भाग पाडले. पायलट सुरक्षित आहे आणि कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याची नोंद करण्यात आली नाही. (हेही वाचा, IAF Plane Crash Nashik: भारतीय वायू दलाचं मिग विमान नाशिकमध्ये कोसळलं, दोन्ही पायलट सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यशस्वी (Watch Video))
IAF ची एक्स पोस्ट द्वारे माहिती
IAF ची एक्स पोस्ट द्वारे माहिती
IAF ने क्रॅशच्या कारणाची चौकशी करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरू केली आहे, जी तांत्रिक बिघाड होण्याच्या परिस्थितीची कसून तपासणी करेल. मिग-29, त्याच्या चपळता आणि लढाऊ क्षमतेसाठी ओळखले जाते, हे अनेक दशकांपासून भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. तथापि, विमानाला अनेक वर्षांमध्ये अनेक तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे अधूनमधून अपघात होतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)