Supreme Court: भारताला पहिल्या महिला CJI मिळण्याचा मार्ग मोकळा, कॉलेजियमने शिफारस केलेल्या सर्व नऊ नावांना केंद्राची मंजूरी
22 महिन्यांनंतर पाठवलेल्या या सर्वच्या सर्व नावांना केंद्राने मान्यता दिली आहे. या नऊ नावांमध्ये तीन नावांचा समावेश आहे. या तीनपैकी एखाद्या महिला न्यायाधीशाला मुख्य न्यायाधीश पदावर संधी मिळू शकते.
भारताला पहिल्या महिला सरन्यायाधीश (First Woman CJI) मिळण्याची शक्यता असे वृत्त काही दिवसांपूर्वीच झळकले होते. ही शक्यता संपून त्याचे वास्तवात रुपांतर होण्याचा मार्ग आदा मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court of India) कॉलेजियमने सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीसाठी पाठिमागील आठवड्यात 9 नावांची शिफारस केंद्राला पाठवली होती. 22 महिन्यांनंतर पाठवलेल्या या सर्वच्या सर्व नावांना केंद्राने मान्यता दिली आहे. या नऊ नावांमध्ये तीन नावांचा समावेश आहे. या तीनपैकी एखाद्या महिला न्यायाधीशाला मुख्य न्यायाधीश पदावर संधी मिळू शकते. पाहा कोण आहेत या तीन महिला न्यायाधीश.
सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदासाठी (First Woman CJI) न्यायाधीश बीव्ही नागरत्ना (Justice B.V.Nagarathna) यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. न्यायाधीश बीव्ही नागारत्ना या कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. नागारत्ना या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश ईएस वेंकटरमैया यांच्या कन्या आहेत. न्यायाधीश नागरत्ना या सध्या कर्नाटक कमर्शियल आणि संवैधानिक कायद्यांची व्याख्या करत अनेक महत्त्वपूर्ण निकाल दिले आहेत. त्यांचे वडील ई एस व्यंकटरमय्या हे 19 जून 1989 ते डिसेंबर 1989 या कालावधीत देशाचे मुख्य न्यायाधीश राहिले आहेत. न्यायाधीश बीव्ही नागरत्ना यांच्यासह कॉलेजियमने शिफारस केलेल्या नावांमध्ये तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती हिमा कोहली आणि गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बेला त्रिवेदी या दोन महिला न्यायाधीशांच्या नावाचा समावेश आहे. (हेही वाचा, First Woman CJI: न्यायाधीश B.V.Nagarathna भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होण्याची शक्यता; घ्या जाणून)
दरम्यान, आपल्या सेवानिवृत्तीपूर्वी भारताचे मुख्य न्यायाधीश एसए बोबडे यांनी म्हटले होते की, भारतासाठी एक महिला मुख्य न्यायाधीश होण्याची वेळ आली आहे. त्यांनी एप्रिलमध्ये म्हटले होते की, आमच्या मनात महिलांचे हीत सन्मान सर्वतोपरी आहे. जो आम्ही चांगल्या पद्धतीने व्यक्त करु शकतो. आमच्या मनात कोणताही किंतू परंतू नाही. फक्त आम्हाला एक चांगला उमेदवार मिळायला हवा इतकेच.