Republic Day Parade 2021: यंदा भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन; परेड वेळ, ठिकाण यासह जाणून घ्या कुठे पाहाल Live

परंतु, यंदाचा सोहळा हा कोविड-19 सावटाखाली रंगणार आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत कमी लोकांच्या उपस्थितीत आणि काहीशा बदलांसह हा सोहळा पार पडेल.

Republic Day Parade (Photo Credits: ANI)

यंदाच्या वर्षी भारत आपला 72 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा करत आहे. परंतु, यंदाचा सोहळा हा कोविड-19 (Covid-19) सावटाखाली रंगणार आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत कमी लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त निघणारी परेड विजय चौकातून सुरु होईल. दरवर्षी 8.8 किमी च्या अंतर ही परेड पार करते. मात्र यंदा केवळ 3.3 किमी चे अंतर कव्हर करण्यात येणार आहे. (Tableau of Maharashtra 2021: प्रजासत्ताक दिनी यंदा संत परंपरेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाची इथे पहा झलक, Watch Video)

2021 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिटिश पंतप्रधान Boris Johnson  यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र युके मधील कोविड-19 च्या नव्या स्ट्रेनच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भारत भेट रद्द केली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या परेडपूर्वी विविध राज्यं आणि शासकीय विभागाच्या सर्व सदस्यांची कोविड-19 टेस्ट दिल्लीच्या कल्चरल कॅम्पमध्ये घेण्यात आली.

प्रजासत्ताक दिन सोहळ्या दरम्यान कोविड-19 चे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातील. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनानिमत्त होणाऱ्या परेडमध्ये काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. यावर्षी इंडियन एअर फोर्सचे राफेल जेट सुद्धा परेडमध्ये भाग घेईल. त्यासोबतच पहिल्यांदा महिला फायटर पायलटचा परेडमध्ये समावेश असेल. त्यासोबतच बांग्लादेश सैन्याचे सदस्य देखील परेडमध्ये सहभाग घेणार आहेत.

प्रजासत्ताक दिन 2021 परेड वेळ:

26 जानेवारी 2021 रोजी होणाऱ्या 72 व्या प्रजासत्ताक दिनी सकाळी 8 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. प्रजासत्ताक दिनाची परेड सकाळी 9 वाजता सुरु होवून सुमारे 11.30 पर्यंत चालेल.

प्रजासत्ताक दिन 2021 परेड लाईव्ह:

2021 च्या प्रजासत्ताक दिनाचे लाईव्ह टेलिकास्ट DD News च्या युट्युब चॅनलवरुन पाहता येईल. परेडचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही ऑनलाईन देखील पाहू शकता. लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सांस्कृतिक मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, आयुष मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय या मंत्रालयाचे सदस्य सहभागी होणार आहेत. दिल्लीतील चार शाळांमधील विद्यार्थी, ईशान्येकडील लोक कलाकार सामिल होतील. दरवर्षी 600 पेक्षा अधिक विद्यार्थी आणि लोक कलाकार परेडमध्ये सहभागी होतात. परंतु, यंदा कोविड-19 संकटामुळे फक्त 400 विद्यार्थी आणि कलाकारांना परवानगी देण्यात आली आहे.

भारतीय सैन्याचे T-90 tanks and BrahMos missile यांचे प्रदर्शन यंदाचा परेडमध्ये होणार आहे. यासोबतच Pinaka multiple launch rocket system आणि bridge laying tanks यांचे देखील प्रदर्शन करण्यात येईल. कोविड-19 च्या नियमांमुळे परेडचे आकर्षक असलेले मोटार सायकल प्रदर्शन होणार नाही. तसंच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून विशेष नियमावली जारी करण्यात आली आहे.



संबंधित बातम्या