India's First Underwater Metro Service: देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रोसेवेचे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

त्यामुळे लोकांचा येण्या-जाण्याचा वेळ कमी होईल. ती सेक्टर V ते हावडा पर्यंत धावेल.

Underwater Metro (Photo Credits-Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 6 मार्चला पश्चिम बंगाल आणि बिहार दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकातामधील देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रोचं उद्घाटन करणार आहेत. ही देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो हावडा मैदान आणि एस्प्लेनेडदरम्यान धावणार आहे. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी करण्यात येणार आहेत. कोलकाता मेट्रोच्या हावडा मैदान-एस्प्लेनेड मेट्रो सेक्शन, कवी सुभाष स्टेशन-हेमंत मुखोपाध्याय मेट्रो सेक्शन आणि तरातला-माजेरहाट मेट्रो सेक्शनचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. (हेही वाचा - Pm Modi On Deepfake: लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना दिला 'हा' इशारा)

पाण्याखालील मेट्रो बोगदा हुगळी नदीच्या पातळीपासून 32 मीटर खाली धावेल. त्यामुळे लोकांचा येण्या-जाण्याचा वेळ कमी होईल. ती सेक्टर V ते हावडा पर्यंत धावेल. हुगळी नदीच्या खाली धावणारी देशातील पहिली पाण्याखालील मेट्रो रेल्वे नदी आणि हावडा यांना कोलकाता शहराशी जोडेल. कोलकाता मेट्रोचा हावडा मैदान-एस्प्लेनेड मेट्रो बोगदा हा भारतातील हुगळी नदीखाली बांधलेला पहिला बोगदा आहे.

हावडा मेट्रो स्टेशन हे भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन आहे. याशिवाय माजेरहाट मेट्रो स्टेशन (तरताळा - माजेरहाट मेट्रो विभागाचे उद्घाटनही होणार आहे) हे अभियांत्रिकीचे एक अनोखे चमत्कार आहे. हे एकमेव मेट्रो स्टेशन आहे जे थेट रेल्वे ट्रॅक आणि प्लॅटफॉर्मच्या वर बांधले गेले आहे.