India-China clash: CAIT कडून चीनी मालावर बहिष्कार

जरी पडली तरी भारत ती सामग्री उभा करण्यास सक्षम आहे. भारतात निर्माण झालेल्या वस्तू चिनी वस्तूंच्या तुलनेत अधिक गुणवत्तापूर्ण असू शकतात. त्या वापरल्याने भारताचे चीनवरील अवलंबित्व कमी होईल.

Chinese Goods | (Photo Credits: PixaBay)

गलवाण (Galwan) खोऱ्यात भारत-चीन लष्करात झटापट झाली. यात भारताचे 20 सैनिक शहीद झाले. चीनकडील बाजूसही मोठी हानी झाली असून, चीनच्या मृत्यू आणि जखमी झालेल्या सैनिकांची संख्या 40 असल्याचे समजते. दरम्यान, उभय देशांचे लष्करी संबंध ताणले गेले असताना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (Confederation of All India Traders) अर्थात कैट (CAIT) न एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कैटने चीनच्या आगळिकीचा निशेध केला आहे. तसेच, चीनी मालांवर बहिष्कार घालण्याचे अवाहनही व्यापाऱ्यांना केले आहे.

सीएआयटीने म्हटले आहे की, 13 अरब डॉलर म्हणजेच सुमारे 1 लाख कोटी रुपयांपर्यंतची चीनी बनावटीच्या वस्तींची आयात डिसेंबर 2021 मध्ये घटवण्यात यावी. भारतात आज घडीला प्रतिवर्ष 5.25 लाख कोटी रुपये म्हणजेच साधारण 70 अब्ज डॉलर किमतीच्या चीनी वस्तू आयात होतात.

सीएआयटीने एका प्रतिक्रियेत सांगीतले की, पहिल्या टप्प्यात सीएआयटीने वस्तुंच्या 500 पेक्षाही अधिक श्रेणी निवडल्या आहेत. ज्यात 3,000 पेक्षाही अधिक वस्तूंचा समावेश आहे. ज्या भारतातही बनवल्या जातात परंतू स्वस्ताईच्या नावाखाली चिनमधून आयात केल्या जातात. (हेही वाचा, India-China Relations: चीनचे राष्ट्रपती मोदींच्या गावात झोपाळा हलवून गेले पण..: शिवसेना)

कोणत्या वस्तूंवर CAIT चा बहिष्कार?

दैनंदिन गरजेच्या वस्तू गारमेंटस खाद्यान्न फर्निचर
 खेळणी स्वयंपाक घरातील सामान घड्याळ लाईटिंग
 फर्निशिंग फॅब्रिक हॅण्ड बॅग ज्वेलरी पॅकिंगसाठी आवश्यक साहित्य
 कापड (टेक्सटाइल) कॉस्मेटिक स्टेशनरी ऑटो पाटर्स
  बांधकामासाठी लागणार साहित्य भेटवस्तू कागद या सणाच्या काळात विकल्या जाणाऱ्या वस्तू
पायताण (फुटवेअर) ईलेक्ट्रीकल्स व ईलेक्ट्रॉनिक् घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू, चश्मे
* CAIT ने 500 प्रकारच्या श्रेणीतील सुमारे 3000 वस्तुंवर बहिष्काराचे अवाहन केले आहे. त्यातील प्रमुख इथे दिल्या आहेत.

सीएआयटीने आपल्या प्रतिक्रियेत पुढे म्हटले आहे की, या वस्तुंच्या निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारच्या अत्याधुनिक साधनसामग्रिची गरज नाही. जरी पडली तरी भारत ती सामग्री उभा करण्यास सक्षम आहे. भारतात निर्माण झालेल्या वस्तू चिनी वस्तूंच्या तुलनेत अधिक गुणवत्तापूर्ण असू शकतात. त्या वापरल्याने भारताचे चीनवरील अवलंबित्व कमी होईल.