SpiceJetच्या अडचणीत वाढ; 17 दिवसांत 8 वेळा बिघाड, DGCAकडून कारणे दाखवा नोटीस
डीजीसीएने या दोन्ही घटनांचा तपास सुरू केला होता. याशिवाय मागील इतर घटनांचाही तपास सुरू आहे.
स्पाइसजेटच्या विमानांमध्ये (SpiceJet Airlines) सततच्या बिघाडानंतर त्रास वाढत आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) स्पाइसजेटला गेल्या 17 दिवसांत तांत्रिक बिघाडाच्या आठ घटनांनंतर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. DGCA ने म्हटले आहे की स्पाईसजेट एअरलाईन विमान नियम, 1937 अंतर्गत सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह हवाई सेवा सुनिश्चित करण्यात अपयशी ठरली आहे. स्पाईसजेटला बजावलेल्या डीजीसीए नोटीसवर नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, प्रवाशांची सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे. स्पाईसजेटच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) सप्टेंबर 2021 मध्ये केलेल्या ऑडिटमध्ये असे आढळून आले की स्पेअर पार्ट्स पुरवठादारांना नियमितपणे पैसे दिले जात नाहीत.
17 दिवसांत 8 वेळा विमानांमध्ये बिघाड
स्पाइसजेटच्या दोन विमानांमध्ये तांत्रिक त्रुटी मंगळवारी उघड झाल्या. स्पाइसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाड होण्याची गेल्या 17 दिवसांतील ही आठवी घटना आहे. डीजीसीएने या दोन्ही घटनांचा तपास सुरू केला होता. याशिवाय मागील इतर घटनांचाही तपास सुरू आहे. स्पाइसजेटच्या विमानांच्या सुरक्षेतील सततच्या त्रुटी लक्षात घेऊन नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
प्रवाशांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची - ज्योतिरादित्य सिंधिया
स्पाईसजेटला बजावलेल्या डीजीसीए नोटीसवर नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, प्रवाशांची सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, 'प्रवाशांची सुरक्षा सर्वोपरि आहे. सुरक्षेला बाधा आणणारी छोटीशी चूकही सखोल चौकशी करून दुरुस्त केली जाईल. (हे देखील वाचा: Excise Duty Hike: पेट्रोल-डिझेल, ATF निर्यातीवरील एक्साईज ड्युटी वाढली; जाणून घ्या याचा तुमच्यावर काय परिणाम होणार?)
Tweet
पाटण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला लागली होती आग
19 जून रोजी पाटणाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाच्या डाव्या पंखात आग लागली होती. यानंतर पटनामध्येच फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले, ज्यामध्ये 185 प्रवासी होते. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात पक्ष्यांची टक्कर झाल्याची घटना समोर आली होती.