Millionaire Migration: देशातील करोडपतींचा भारताला रामराम! 2022 मध्ये चीन, रशियासह भारतातून सर्वाधिक करोडपतींचं स्थलांतर

जागतिक सल्लागार हेन्ली आणि पार्टनर्सच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.

2022 मध्ये सर्वाधिक करोडपती आपला देश सोडून गेलेल्या देशांमध्ये भारताचा तिसरा नंबर लागला आहे. वर्षभरात रशियातून पंधरा हजार, चीनमधून (China) दहा हजार तर भारतातून  ८ हजार करोडपतींनी स्थलांतर केलं आहे. जागतिक सल्लागार हेन्ली आणि पार्टनर्सच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. पण या रिपोर्टमध्ये  हे देखील नमूद करण्यात आलं आहे की भारतासाठी ही जराही चिंताजनक बाब नाही. कारण ८ हजार करोडपतींनी स्थलांतर केलं तरी भारत दरवर्षी यापेक्षा अधिक पटींनी करोडपती तयार करतो. भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी असे विविध उद्योगपती दरवर्षी उदयास येतात. तसेच भारतातून स्थलांतरन (Migration From India) म्हणजे भारत सोडून गेलेल्यांप्रमाणेचं भारतात पुन्हा परतणाऱ्या करोड पतींची संख्या देखील मोठी आहे. २०३१ पर्यत भारतातील करोडपतींची संख्या आत्ताच्या तुलनेत ८० टक्क्यांनी वाढणं अपेक्षित आहे. हे झाल्यास भारत सर्वात वेगाने आर्थिकदृष्ट्या वाढलेला देस असेल.

 

तसेच हाँगकाँग SAR, युक्रेन (Ukraine), ब्राझील (Brazil), मेक्सिको (Mexico), यूके (UK), सौदी अरेबिया (UAE) आणि इंडोनेशिया (Indonesia) सारख्या काही देशांमधून 2022 मध्ये सर्वाधिक स्थलांतर झालीत. तरी चीनमधून (China) करोडपतींचे झालेले स्थलांतर ही चीनसाठी चिंतेची बाब आहे कारण हुआवेई ५जी (5G) च्या नुकसानामुळे चीनमधून सर्वाधिक करोडपतींचं स्थलांतर झाल्याचं या अहवालात म्हण्टलं आहे. ऑस्ट्रेलिया (Australia), यूके (UK) आणि यूएसए (US) सारख्या अनेक प्रमुख बाजारपेठांनी Huawei 5G वर बंदी घालतल्याने चीनला  मोठ नुकसान झालं आणि अनेक करोडपत्तींनी चीनला रामराम ठोकला. (हे ही वाचा:- Population Control Bill: 'भारतात एका मिनिटात 30 मुले जन्माला येतात, लोकसंख्या नियंत्रण विधेयक आवश्यक'- केंद्रीय मंत्री Giriraj Singh यांचे मोठे वक्तव्य)

 

कोव्हिड (Covid) कालावधीत म्हणजेच २०२० आणि २०२१ या वर्षात सर्वात कमी स्थलांतर झाल्याची माहिती मिळत आहे. तर २०२२ मध्ये युक्रेनमधून ४२ टक्के जनतेने म्हणजे जगात सर्वाधिक स्थलांतर केल्याची नोंद आहे. याचबरोबर UAE, इस्रायल, अमेरिका, पोर्तुगाल, कॅनडा, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ग्रीस आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये लक्षाधीशांची सर्वाधिक आवक झाली.