IMD Weather Forecast: महाराष्ट्रासह विविध राज्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या Monsoon Mood

येत्या आठ ऑगस्टपर्यंत देशभरात पर्जन्यवृष्टी राहील असा हा अंदाज सांगतो.

Monsoon Rains | Representational image (Photo Credits: pxhere)

Monsoon Update Maharashtra: आज पाऊस पडणार आहे का, उद्या पाऊस पडणार आहे का, आजचे हवामान कसे असेल? असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पर्जन्यवृष्टीबद्दल पडत असतील तर ही माहिती तुमच्या कामाची आहे. भारतीय हवामान विभाग अर्धातच आयएमडी द्वारा येत्या 8 ऑगस्टपर्यंत हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या अंदाजानुसार देशभरामध्ये पुढच्या तीन दिवसांमध्ये विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Monsoon Rains Highlights) कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तर अतिमुसळधार पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

7 ऑगस्टला पाऊस पडेल का?

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसा 7 ऑगस्टपर्यंत देशामध्ये अतिवृष्टी होईल. यात प्रामुख्याने पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय आणि नागालँड, मणिपूरमध्ये अतिवृष्टीचा अंदाज आहे. दुसऱ्या बाजूला उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पूर्व राजस्थान, जम्मू आणि मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात पाऊस आहे का ?

हवामान विभागाने महाराष्ट्रातील पावसाबद्दल माहिती देताना म्हटले आहे की, महाराष्ट्रात, उत्तर कोकणात बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण-गोव्यात आज हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, उत्तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य, ईशान्य, दक्षिण भारतात पर्जन्यमान कसे असेल

मध्य भारतात प्रामुख्याने MP मध्ये 04 आणि 05 ऑगस्ट (आज) रोजी अचानक मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ईशान्य भारताबाबत सांगायचे तर पुढील चार दिवसांत अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय आणि नागालँड, मणिपूर येथे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतामध्ये पुढच्या चार दिवसांमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी होईल. रोजी तामिळनाडूमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान वायव्य भारतात एकाकी मुसळधार पावसाची शक्यता आहे.