IRCTC तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या IIT खडगपुरच्या माजी विद्यार्थ्याला RPF कडून अटक
आरोपी हा आयआयटी खडगपूर येथून ग्रॅज्युएट झाला असून त्याने आयआरसीटीसीचे अवैध सॉफ्टवेअर तयार केले होते.
अवैध सॉफ्टवेअरच्या (Illegal Software) मदतीने आयआरसीटीसी (IRCTC) वेबसाईटवरुन तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या एका 36 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा आयआयटी खडगपूर (IIT Kharagpur) येथून ग्रॅज्युएट झाला असून त्याने आयआरसीटीसीचे अवैध सॉफ्टवेअर तयार केले होते. या सॉफ्टवेअरच्या मदतीने तो तिकीटांचा काळाबाजार करत होता. अनधिकृत एजेंटचे काम करणाऱ्या आरोपीला रेल्वे संरक्षण बलाकडून (Railway Protection Force) अटक करण्यात आली आहे. (IRCTC च्या वेबसाईट्स मध्ये होणार मोठा बदल, AI च्या माध्यमातून करता येणार तिकिट बुकिंग)
प्राप्त माहितीनुसार, गुप्त अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर आरपीएफने आरोपीला अटक केली आहे. आरोपीने आयआरसीटीसी वरुन तिकीट बुक करण्यासाठी एक विशेष सॉफ्टवेअर विकसित केले होते. याच्या मदतीने त्याने आतापर्यंत लाखो तिकीट्स बुक केले आहेत. इतर सॉफ्टवेअरच्या तुलनेत हे सॉफ्टवेअर IRCTC वेबसाईटवरुन जलद गतीने तिकीट बुकींग करण्यास समर्थ होते.
आरोपीवर भारतीय रेल्वे अधिनियम कलम 143 अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडे 93000 आयआरसीटीसी लॉगिंन आयडीचा टेडाबेस असल्याची माहिती समोर येत आहे. तर देशभरात त्याचे तब्बल 4 लाख ग्राहक आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हे काम करत असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. आरोपीने निकृष्ट दर्जाचे एक सॉफ्टवेअर विकसित केले होते. याच्या मदतीने साईटवर बुकींग सुरु होताच प्रवाशांची माहिती अगदी जलद गतीने आपोआप भरली जात असे. प्रत्येक तिकीटासाठी तो ग्राहकांकडून 30 रुपये आकारत होता.
आरोपी तिकीटांच्या काळाबाजारासोबतच बिटकॉईनचे डिल्सचा व्यवसायही करत होता. तिकीट बुकींचे सॉफ्टवेअर आरोपी आपल्या ग्राहकांना मोफत वापरासाठी देत होता. या वर्षाच्या मार्चपासून त्याने ग्राहकांकडून या सॉफ्टवेअरसाठी छोटी रक्कम आकारण्यास सुरुवात केली, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अवैध तिकीट विक्री करणाऱ्या 14 दलालांना रेल्वे संरक्षण बलाने मे महिन्यात अटक केली होती. यात 8 आयआरसीटीसीचे एजेंट होते. रिपोटनुसार, त्यांच्याकडून तब्बल 6,36,727 रुपयांची तिकीट जप्त करण्यात आली होती.