नोकरदार वर्गासाठी दिलासादायक बातमी! ऑफिसमध्ये 15 मिनिटांपेक्षा जास्त काम केल्यास मिळणार ओव्हरटाईम? सरकारचा नवा नियम
ज्यामुळे कंपनीला कर्मचा-यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.
सध्या बरेच जण कोरोना व्हायरसमुळे वर्क फ्रॉम करत आहे. त्यामुळे कंपनी सांगेल तेव्हा सांगतील तितका वेळ नोकरदारवर्गाला (Office Workers) काम करावे लागत आहे. शिवाय ऑफिसात जाणा-यांचीही काही वेगळी परिस्थिती नाही. यामुळे अनेकांना ऑफिस अवर्सपेक्षा जास्त तास नोकरदारवर्गाला काम करावे लागते. मात्र आता सरकारचा नवा नियम आला असून लवकरच हा नियम लागू होईल. ज्यामध्ये कर्मचा-यांनी जर ठरलेल्या तासांपेक्षा 15 मिनिटांच्या वर काम केल्यास त्यांचा ओव्हरटाईम (Overtime) लावला जाणार आहे. ज्यामुळे कंपनीला कर्मचा-यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.
लाईव्ह हिंदुस्तानने यासंबंधीचे वृत्त दिलं आहे. आधी ठराविक शिफ्ट व्यतिरिक्त अर्धा तासांची मुभा होती. त्यानंतर ओव्हरटाईम मोजला जायचा. पण आता ही मर्यादा बदलून कंपनी 15 मिनिटं जास्त काम केल्यास त्याला ओव्हराटाईममध्ये मोजणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावर अद्याप सरकार काम करत असून लवकरच यासंबंधी अधिकृत माहिती समोर येईल.हेदेखील वाचा- Sarkari Naukari: RBI ते AIIMS मध्ये नोकरीची संधी; पहा कधी,कुठे कराल अर्ज
कामगार सचिव अपूर्व चंद्र म्हणाले, नियम तयार केले जात असून, येत्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात सर्व संबंधितांशी चर्चा झालीय. लवकरच हे कामगार मंत्रालय चार नवीन कायदे लागू करण्याच्या स्थितीत असेल. यामध्ये पगार/वेतन कोड, औद्योगिक संबंधांचे कोड, कामाशी संबंधित सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणी अटी (ओएसएच) आणि सामाजिक सुरक्षा असा कायद्यांचा समावेश असेल. कामगार मंत्रालय एप्रिलपासून चार कायद्यांची अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे.