इम्रान खान जर इतकेच उदार असतील तर त्यांनी मसूद अजहर याला भारताच्या हवाली करावं- सुषमा स्वराज (Video)
जैश-ए-मोहम्मदचा मसूद अजहर विरोधात केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानाला खडे बोल सुनावले आहेत.
जैश-ए-मोहम्मदचा मसूद अजहर विरोधात केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानाला खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्तानने दहशतवादा विरोधात कठोर पाऊलं उचलावीत. पाकिस्तान जोपर्यंत दहशतावदी संघटनांविरोधात कारवाई करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली जाणार नाही. इतकंच नाही तर पुढे त्या म्हणाल्या की, इम्रान खान इतकेच उदार असतील आणि त्यांना खरंच शांतता हवी असेल तर त्यांनी मसुद अजहरला भारताच्या हवाली करावं, 'इंडियाज वर्ल्ड: मोदी गव्हर्नमेंट्स फॉरेन पॉलिसी या कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तान विरुद्धची भूमिका स्पष्ट केली.
इम्रान खान हे अत्यंत चांगले राजकारणी असून उदार मनाचे आहेत. त्यांना शांतता हवी आहे, असे काही लोकांचे म्हणणे आहे. यावर सुषमा स्वराज म्हणाल्या की, "इम्रान खान जर इतके उदार असतील तर त्यांनी जैश-ए-मोहम्मदचा मसूद अजहरला भारताच्या ताब्यात द्यावे, मग कळेल की ते किती उदार आहेत ते."
वातावरण दहशवाद मुक्त असेल तर भारत पाकिस्तानशी चर्चा करण्यास तयार असल्याचे ही त्यांनी सांगितले. पाकिस्तानला भारताची चर्चा करायची असल्यास पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवावे, त्यांच्यावर कारवाई करावी, तरच चर्चा होऊ शकते. चर्चा आणि दहशतवाद एकत्र होऊ शकत नाही, असेही सुषमा स्वराज म्हणाल्या.
पहा व्हिडिओ:
इतकंच नाही तर अजहर पाकिस्तानात नसल्याबद्दल इम्रान खान सरकार खोटे बोलत होती. त्यानंतर मसूद अजहर पाकिस्तानात असून तो आजारी असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी ही त्यांनी ओसामा बिन लादेन पाकिस्तानात नसल्याचे सांगितले होते. मात्र तो तिथेच सापडला. अशा प्रकारे तुम्ही अजून किती वेळा खोटं बोलणार, असा प्रश्नही स्वराज्य यांनी उपस्थित केला.