वाहनांवर Fastag असूनही जर त्यामध्ये आढळल्या 'या' त्रुटी तर भरावा लागणार दुप्पट दंड
नव्या नियमांनुसार नुसते फास्टॅग लावणे बंधनकारक नसून त्यासोबत जर त्यात काही त्रुटी आढळल्यास तुमच्याकडून दुप्पट दंड आकाराला जाणार आहे.
टोल नाक्यावर होणारी वाहनांची गर्दी आणि लांबच लांब रांगा थांबविण्यासाठी केंद्र सरकारने वाहनांवर फास्टॅग लावणे बंधनकारक केले. भारतामध्ये मोदी सरकारच्या कॅशलेस सिस्टमला नव्याने चालना देण्यासाठी ‘वन नेशन वन फास्टॅग’ (One Nation, One Fastag) ही योजना अंमलात आणली. त्यामुळे आता देशभरात नॅशनल हायवेवरून प्रवास करताना कोणतेही वाहन रोख पैशांच्या स्वरूपात टोल न देता कुठेही प्रवास करू शकतो. मात्र आता बदलण्यात आलेल्या नव्या नियमांनुसार नुसते फास्टॅग लावणे बंधनकारक नसून त्यासोबत जर त्यात काही त्रुटी आढळल्यास तुमच्याकडून दुप्पट दंड आकाराला जाणार आहे.
नव्या नियमांनुसार, जर तुमच्या वाहनाला लावलेले फास्टॅग रिचार्ज केलेल नसेल अथवा कुठे डॅमेज झाले असून तर तुमच्याकडून दुप्पट दंड वसूल केला जाईल. केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. कारण आतापर्यंत असे बरेच प्रकार पाहिले गेले आहेत जिथे फास्टॅग आहे मात्र योग्य रित्या काम करत नाही वा त्याचे रिचार्ज केले नाही. अशा वेळी लोक सर्रासपणे फास्टॅगच्या लाईनमध्ये गाड्या घुसवतात आणि मग टोल भरतात. मात्र यामुळे ही रांग वाढत जाते. FASTag साठी 1 डिसेंबरची डेडलाईन; ऑनलाईन माध्यमातून पहा कसा मिळवाल फास्टॅग
फास्टॅग साठी आवश्यक कागदपत्र
- वाहनाचं नोंदणीचं पत्र
- वाहनाच्या मालकाचा फोटो
- केव्हायसीसाठी डॉक्युमेंट्स, वास्तव्याचा दाखला
ऑनलाईन प्रमाणेच ऑफलाईन माध्यमातूनही फास्टॅग हवा असल्यास तो तुम्हांला टोलनाक्यावर, बॅंकेमध्ये उपलब्ध आहे. दरम्यान आता प्रवासादरम्यान टोलनाक्यावर आता स्कॅनरच्या माध्यमातून बारकोड स्कॅन होईल आणि तुमच्या अकाऊंटमधून थेट पैसे कापले जाणार आहे. तर त्याची व्हॅलिडीटी 5 वर्षांची आहे.