COVID-19 Self Testing Kit: ICMR कडून अजून एका Rapid Antigen Test Kit ला मान्यता; घराच्या घरी करता येईल कोविड-19 टेस्ट

या किटद्वारे घरच्या घरी कोविड-19 टेस्ट करता येईल.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Oxford Twitter)

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (The Indian Council of Medical Research) Abbott Rapid Diagnostics Division च्या होम टेस्टिंग किटला (Home Testing Kit) मान्यता दिली आहे. या किटद्वारे घरच्या घरी कोविड-19 टेस्ट (Covid-19 Test) करता येईल. या किटला 5 जुलै 2021 पासून मान्यता मिळणार असून कंपनीकडून लवकरच या किटची किंमत घोषित करण्यात येईल. यापूर्वी पुणे स्थित मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सच्या 'कोविसेल्फ' (CoviSelf) या होमबेस्ड टेस्ट किटला आयसीएमआरने (ICMR) मान्यता दिली होती. या किटची किंमत 250 रुपये ठरवण्यात आली होती.

घरच्या घरी वापरल्या जाणाऱ्या टेस्ट किट्सबद्दल आयसीएमआरकडून अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. लक्षणं आढळणाऱ्या व्यक्तींवर किंवा कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनीच आरएटी टेस्ट (Rapid Antigen Test) करण्याचा सल्ला आयसीएमआरकडून देण्यात आला आहे.

होम टेस्टिंग किटचा मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवर डाऊनलोडिंगसाठी उपलब्ध आहे. टेस्ट कशी करावी आणि टेस्टचा रिपोर्ट काया आहे, हे तुम्हाला या अॅपद्वारे कळेल. (COVID-19 Home Testing Kit: कोविड-19 च्या होम टेस्ट किट 'कोविसेल्फ' चा कोण आणि कसा वापर करु शकता? पहा Video)

गाईडलाईननुसार टेस्ट प्रोसिजर केल्यानंतर टेस्ट स्ट्रिपचा फोटो स्मार्टफोनद्वारे काढून मोबाईल अॅप डाऊनलोड करता येईल आणि युजर रजिस्ट्रेशन देखील करता येईल. अॅपवर कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह दिसत असल्यास पुन्हा टेस्ट करण्याची आवश्यकता नाही. टेस्टमध्ये निगेटीव्ह आलेल्या व्यक्तीला जर कोरोनाची लक्षणं दिसत असतील तर त्यांनी आरटीपीसीआर टेस्ट करणे गरजेचे आहे. आरएटी टेस्ट मध्ये काही वेळा पॉझिटीव्ह रिपोर्ट चुकीचा दाखवण्याची शक्यता असते.

आरएटी टेस्ट निगेटीव्ह परंतु कोविड-19 ची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीने आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक असल्याचे आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरच्या गाईडलाईनमध्ये म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif