कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालय बुधवारी देणार निर्णय; भारत - पाकिस्तान उभय देशात उत्सुकता
21 जुलै 2018 मध्ये या प्रकरणावर न्यायालयात खुली सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणातील उत्सुकता वाढली आहे. निकाल कोणाच्या बाजून जाईल याबाबत काहीच तर्क सध्यातरी लावता येत नाही.
पाकिस्तानच्या कारागृहात बंद असलेला भारतीय नौदलाचा माजी अधिकारी कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice) बुधवारी (16 जुलै 2019) निर्णय देणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार, हा निर्णय साधारण बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजनेच्या दरम्यान दिला जाऊ शकतो. न्यायालयाच्या निर्णयावर भारत (India), पाकिस्तान (Pakistan) देशासह जगभराती आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांचे लक्ष लागून राहिले आहे. 21 जुलै 2018 मध्ये या प्रकरणावर न्यायालयात खुली सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणातील उत्सुकता वाढली आहे. निकाल कोणाच्या बाजून जाईल याबाबत काहीच तर्क सध्यातरी लावता येत नाही.
दरम्यान, कुलभूषण प्रकरणात हा निर्णय जर भारताच्या बाजूने आला तर, भारतासाठी तो मोठा विजय ठरणार आहे. दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक सांगतात की, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय मानने हे कोणत्याही देशावर बंधनकारक नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय मानने हे केवळ त्या त्या देशावर अवलंबून आहे. असे असले तरी, याच वर्षाच्या जानेवारी महिन्यात पाकिस्तानाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले होते की, कुलभूषण प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय जर भारताच्या बाजूने लागला तर, तो पाकिस्तान मान्य करेन. (हेही वाचा, Kulbhushan Jadhav Case: ICJ कोर्टात पाकिस्तानचे भारतावर खोटे आरोप; कुलभूषण जाधव दोषी असल्याचा दावा)
भारत पाकिस्तानसह जगभरातील राजकीय वर्तुळ आणि अभ्यासकांचे लक्ष लागून राहिलेल्या या खटल्यात काय निर्णय येतो याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. निर्णय कोणत्याही देशाच्या बाजूने लागू शकतो. या निर्णयाचा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय संबंधांवरही मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे या खटल्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.