IAS officer Tina Dabi दुसर्यांदा लग्न करून होणार महाराष्ट्राची सून; जाणून भावी पती Pradeep Gawande कोण?
टीना डाबी आणि प्रदीप गवांडे यांचा विवाह एप्रिल 2022 मध्ये राजस्थान मध्ये होण्याचा अंदाज आहे.
IAS ऑफिसर Tina Dabi दुसर्यांदा लग्नाच्या बेडीमध्ये अडकण्यासाठी तयार आहे. नुकतीच Tina Dabi ने इंस्टाग्रामवर आपल्या भावी पतीचा फोटो केला आहे. #fiancé अशा सह तिने फोटो शेअर केला आहे. दरम्यान Tina Dabi महाराष्ट्राची सून होणार आहे. तिच्या भावी पतीचं नाव Pradeep Gawande आहे.
Tina Dabi हे नाव यापूर्वी अनेकदा चर्चेमध्ये आलं आहे. पहिल्यांदा Tina Dabi ने 2015 मध्ये नागरी सेवा परीक्षा मध्ये अव्वल स्थान मिळवल्याने तिच्या नावाची चर्चा झाली होती. तर नंतर तिने Athar Aamir Ul Shafi Khan या 2015 सालच्याच आयएएस परीक्षेमध्ये दुसर्या आलेल्या
उमेदवारासोबत तिने लग्न केल्याने तिने पुन्हा अनेकांचे लक्ष वेधले होते. टीनाचा पहिला विवाह फार टिकला नाही. 2021 साली तिने घटस्फोट घेतला. आता टीना पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे त्यामुळे आता टीना कुणासोबत विवाह बंधनात अडकणार याची चर्चा आहे. नक्की वाचा: प्रेमविवाह केला आहे? की करायचा आहे? जाणून घ्या फायदे तोटे.
Tina Dabi चा भावी पती प्रदीप गावंडे कोण?
प्रदीप गावंडे यांचा जन्म महाराष्ट्रातील आहे. ते 41 वर्षांचे आहेत. प्रशासकीय सेवेमध्ये येण्याआधी त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण घेतले असून ते डॉक्टर आहेत. सध्या प्रदीप गावंडे Archeology & Museums, Rajasthan चे डिरेक्टर आहेत. तर टीना राजस्थान सरकारच्या Joint Secretary Finance (Tax)मध्ये काम करत आहे. प्रदीप गावंडे आणि टीना मध्ये 13 वर्षांचं अंतर आहे.
Tina Dabi 2015 मध्ये नागरी सेवा परीक्षेत टॉप करणारी दलित समाजातील पहिली व्यक्ती ठरली आहे. दाबी आणि खान यांनी 2016 मध्ये प्रथम फेसबुकवर त्यांच्या नातेसंबंधाची घोषणा केली आणि नंतर 2018 मध्ये त्यांचे लग्न झाले. या जोडप्याने 2020 मध्ये अधिकृतपणे त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली होती.