भारतीय वायुसेना विंग कमांडर अभिमान वर्धपान पाकिस्तान मधून अटारी वाघा बॉर्डरमार्गे मायदेशात सुखरुप परतले, पाहा फोटो आणि व्हिडिओ

भारतीय वायुसेना (Indian Air Force) विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman ) आज शुक्रवारी (1मार्च) रोजी पाकिस्तान (Pakistan) मधून अटारी वाघा बॉर्डरद्वारे भारतात (India) सुखरुप परतले आहेत.

भारतीय वायुसेना विंग कमांडर अभिमान वर्धपान पाकिस्तान मधून अटारी वाघा बॉर्डरमार्गे मायदेशात सुखरुप परतले (Photo Credits-Twitter/ANI)

भारतीय वायुसेना (Indian Air Force) विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman ) आज शुक्रवारी (1मार्च) रोजी पाकिस्तान (Pakistan) मधून अटारी वाघा बॉर्डरद्वारे भारतात (India) सुखरुप परतले आहेत. तसेच दोन दिवसांच्या पाकिस्तानच्या तावडीतून सुखरुप परतले आहेत. तर पाकिस्तानने मिग-21 हे विमानावर हल्ला केल्याने त्याचा अपघात झाला होता.मात्र भारताने पाकिस्तानचे एफ-16 हे विमान उद्ध्वस्त करुन लावले होते. मात्र आज भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी असल्याने सर्वत्र जल्लोष केला जात आहे.

तसेच अमृतसर येथून एका विशेष विमानाने अभिनंदन यांना दिल्ली येथे घेऊन जाण्यात येणार आहे. मात्र वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे एअर व्हाईस मार्शल आरजीके कपूर यांनी सांगितले आहे. अभिनंदन यांच्या शौर्याचा सर्वत्र गौरव करण्यात येत असून भारतीयांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.

बुधवारी भारतीय सीमारेषेच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना हवेतूनच पिटाळून लावताना विंग कमांडर यांचे मिग-21 हे भारताचे लढाऊ विमान पाकव्याप्त काश्मिर येथे कोसळे. त्यावेळी पाकिस्तानने विंग कमांडर यांना कैद करण्यात आले. मात्र भारताने सातत्याने पाकिस्तानवर दबाब टाकल्यानंतर आज विंग कमांडरला भारतात सुखरुप भारतात आणण्यात आले आहे.

तर आज सकाळी 9 वाजल्यापासून सर्व भारतीय वाघा बॉर्डरवर आपल्या शूरवीर विंग कमांडर अभिनंदन यांची वाट पाहत होते. अखेर कमांडर मायदेशी परतल्याने या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झळकून येत असून त्यांच्या नावाचा जयजयकार केला जात आहे.