'जामिया'च्या विद्यार्थ्यांची मला काळजी वाटते' भारताचा माजी खेळाडू इरफान पठाण यांचे ट्वीट
नागरिकत्व दुरूस्ती कायदाच्या विरोधात (Citizenship Amendment) संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रीया येऊ लागल्या आहे. नागरिकत्व दुरूस्ती कायद्याचा विरोधात जामिया मिलिया विद्यापीठातील (Jamia Malia Institude) विद्यार्थ्यांनी निदर्शन केली होती. हे अंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक पोलिसांनी लाठी चार्ज केला होता. यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. यातट भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान फठाण (Irfan Pathan) यांनीही ट्विट करुन सर्वांचे लक्ष आकर्षित केले आहे. जामियाच्या विद्यार्थ्यांची मला काळजी वाटते असे इरफान पठाण यांनी भाष्य केले आहे.
भारतात नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आसाम, मेघालय आणि दिल्लीचे वातावरण बदलले आहे. या कायद्याच्या विरोधात अनेक लोकांनी विरोध दर्शवला आहे. यात राजकीय नेते, सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या परिस्थितीवर भारताचा माफी वेगवान गोलंदाज इरफान पठाण आपले मत मांडले आहेत. राजकारणात आरोप, प्रत्यारोप आणि विरोध हे नेहमीच आहे. परंतु, जामियाच्या विद्यार्थ्यांची मला काळजी वाटते, असे इरफान पठाण यांनी ट्विट करत विद्यार्थ्यांच्या बाबतीत चिंता व्यक्त केली आहे. हे देखील वाचा-Citizenship Amendment Act 2019: सुधारित नागरिकत्व कायद्यावरून सुरू असलेली हिंसक निदर्शने दुर्दैवी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चिंताजनक ट्विट
इरफान पठाण यांचे ट्वीट-
पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतात आलेल्या घुसखोरांना भारतीय नागरिकत्व देण्याचा कायदा नुकताच संसदेत मंजूर करण्यात आला. मात्र, नागरिकत्व देताना मुस्लिमांना वगळण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. त्यामुळे या कायद्यास विरोध होत आहे. ईशान्य भारतातील राज्यांनी सामाजिक समतोल बिघडून जाण्याच्या भीतीने आंदोलन सुरू केले आहे. तर, जामिया मिलिया आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठातही विद्यार्थी आंदोलन करत आहेत.