Jaipur Shocker: करवा चौथला उशिरा घरी परतल्याने नवरा-बायकोत भांडण; पत्नीने रेल्वेसमोर मारली उडी, तर पतीने गळफास घेत संपवले जीवन

आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने आपल्या मोठ्या भावाला व्हॉट्सॲपवर सुसाईड नोट पाठवली आणि लिहिले, ‘भाऊ, मी हरलो. माफ करा! माझी पत्नी रेल्वेसमोर ठार झाली. असे लिहून त्याने स्वतः ही मृत्यूला कवटाळले.

Suicide प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Jaipur Shocker: राजस्थानच्या जयपूर (Jaipur) मध्ये करवा चौथ (Karva Chauth 2024) च्या दिवशी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. घरात एकटीच पतीची वाट पाहत चंद्राकडे बघत बसलेल्या पत्नीला पती उशिरा आल्याने इतका संतापला की, तिने रेल्वेसमोर उडी मारून आपले जीवन संपवले. रेल्वे रुळावर पत्नीचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह पाहून पतीला धक्का बसला आणि त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने आपल्या मोठ्या भावाला व्हॉट्सॲपवर सुसाईड नोट पाठवली आणि लिहिले, ‘भाऊ, मी हरलो. माफ करा! माझी पत्नी रेल्वेसमोर ठार झाली. असे लिहून त्याने स्वतः ही मृत्यूला कवटाळले.

हरमदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांगल सिरस गावात ही घटना घडली. रविवारी रात्री उशिरा घरी आल्याने घनश्याम विणकर आणि त्यांची पत्नी मोनिका यांच्यात भांडण झाले. त्यानंतर मोनिका घरातून निघून गेली. यानंतर घनश्यामने मोनिकाची समजूत काढण्यासाठी तिच्या मागे धाव घेतली. मात्र मोनिकाने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. (हेही वाचा - World Suicide Prevention Day: भारतामध्ये तरुण लोक करतात सर्वाधिक आत्महत्या; मानसिक आरोग्यावरही लक्ष केंद्रित करणे गरजेचे- Expert)

यावेळी मोनिकाच्या शरीराचे तुकडे झाले. हे पाहून घनश्याम घरी आला आणि त्याने काही तासांनंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. पती-पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच हरमदा पोलीस स्टेशनने घटनास्थळ गाठून मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवला. हरमडा पोलिस स्टेशनचे अधिकारी उदयभान यादव यांनी सांगितले की, घनश्याम आणि मोनिका अशी मृतांची नावे असून त्यांनी रविवारी रात्री उशिरा आत्महत्या केली.  (हेही वाचा: Rajasthan Shocker: पत्नीच्या रील्सवर येत होत्या अश्लील कमेंट्स; नाराज पतीने केली आत्महत्या, मृत्यूपूर्वी Live करत दिली माहिती)

करवा चौथच्या सणावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. भांडण झाल्यानंतर साडेबाराच्या सुमारास घनश्यामची पत्नी मोनिका घरातून बाहेर पडून जयराम पुलाजवळील रेल्वे रुळावर रेल्वेसमोर आली. दुपारी दोनच्या सुमारास घनश्यामनेही आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना घनशामची 4 ओळींची सुसाइड नोट सापडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घनश्याम एका नेटवर्क मार्केटिंग कंपनीत कामाला होता. तो करवा चौथच्या दिवशी उशिरा घरी पोहोचला होता. यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि दोघांनी आत्महत्या केली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif