तुम्हाला बनावट लस तर दिली नाही ना? केंद्राने सांगितले कशी पडताळणी कराल

हेच कारण आहे की, कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या दिशेने काम केले जात आहे.

Corona Vaccines | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोना लसीकरण अत्यंत सुरक्षित उपाय मानला जात आहे. हेच कारण आहे की, कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या दिशेने काम केले जात आहे. एका बाजूला लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारात बनावट लसीकरणांचा खुलासा करण्यात आला आहे. नुकत्याच दक्षिण-पूर्व एशिया आणि अफ्रिकेत बनावट लसी आढळून आल्या आहेत. त्यानंतर डब्लूएचओ कडून देशातील सर्व बनावट लसीकरणावरुन सूचित करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात बनावट लसी मिळाल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना याबद्दल माहिती दिली आहे. त्यावरुन कळू शकते की, लस बनावट आहे की नाही. केंद्र सरकारने या संबंधित राज्य सरकारला पत्र सुद्धा लिहिले आहे, पत्राच्या माध्यमातून राज्यांना कोवॅक्सिन, कोविशील्ड आणि स्पुटनिक-वी कोरोनाच्या लसी बद्दल काही प्रकारची माहिती दिली आहे. सरकारने जी माहिती दिली आहे त्यावरुन अगदी सहज कळू शकते की लस बनावट आहे की नाही.(COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 42,766 नवे कोरोना रूग्ण; Recovery Rate 97.42%)

-कोविशील्ड (Covishield)

-SII चे प्रोडक्ट लेबल गडद हिरव्या रंगात असेल.

-ब्रँन्डच्या नावाचा ट्रेड मार्कसह (COVISHIELD) लिहिलेले दिसून येईल.

-त्यावर CGS NOT FOR SALE असे ही लिहिलेले दिसेल.

-कोवॅक्सिन (Covaxin)

-लेबलवर अदृश्य UV हेलिक्स लावण्यात आलेले असेल. हे लेबल फक्त युवी लाइटमध्ये पाहता येईल.

-लेबल क्लेम डॉट्स दरम्यान लहान अक्षरात COVAXIN असे लिहिले असेल.

-कोवॅक्सिन मध्ये X दोन रंगात दिसून येईल. याला ग्रीन फॉयल इफेक्ट असे म्हणतात.

-स्पुटनिक-वी (Sputnik-V)

-स्पुटनिक वी ही रुस मधील दोन प्लांट मध्ये तयार केली जात आहे, अशातच दोन वेगवेगळे लेबल त्यासाठी दिले आहेत. परंतु दोघांची माहिती एकच आहे. फक्त मॅन्युफॅक्चरर मध्ये फरक आहे.

-रुसने आतापर्यंत जेवढ्या लसी दिल्या आहेत त्यामध्ये फक्त 5 एमपूलच्या पॅकेटवर इंग्लिश लेबल लिहिला आहे. या व्यतिरिक्त सर्व पॅकेटवर रुस असे लिहिले आहे.

दरम्यान, देशात तीन कोरोनाच्या लसी दिल्या जात आहेत. यामध्ये कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक-वी चा समावेश आहे. तर वरील पद्धतीने तुम्ही लस ही बनावट आहे की नाही ते तपासून पाहू शकता.