Aadhar Card वरील तुमचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक तपासून पाहण्यासाठी 'या' टीप्स फॉलो करा
कारण आधार कार्ड शिवाय तुम्हाला एखादे काम पूर्ण करण्यासाठी अडथळा येऊ शकतो.
देशभरातील नागरिकांसाठी सध्याच्या काळात आधार कार्ड (Aadhar Card) सर्वात महत्वपूर्ण कागपत्रांपैकी एक मानले जाते. कारण आधार कार्ड शिवाय तुम्हाला एखादे काम पूर्ण करण्यासाठी अडथळा येऊ शकतो. शासकीय कामकाजासह लहान मोठ्या कामांसाठी सुद्धा आधार कार्डची गरज भासते. परंतु जर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्ड सोबत लिंक केल्यास तुम्हाला त्यावर या संबंधित आवश्यक माहिती दिली जाते. अशातच तुम्ही आधार कार्ड सोबत कोणता मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड केला आहेत ते विसल्यास तर त्रस्त होऊ नका. कारण तुम्हाला घरबसल्या या बाबत माहिती मिळणार आहे. तर जाणून घ्या कशा पद्धतीने तुमचा आधार्ड कार्डसाठी कोणता मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड आहे ते तपासून पहाल. (आधार कार्ड हरवल्यास Re-Print कसे कराल, जाणून घ्या)
>>UIDAI वेबसाईट्सचा वापर तुम्हाला येथे करावा लागणार
-काहीजण एकाच वेळी दोन मोबाईल क्रमांकाचा वापर करतात. त्यामुळे आधार कार्ड सोबत नेमका कोणता मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड आहे ते लक्षात ठेवणे थोडे कठीणच होते. त्यामुळे रजिस्टर्ड क्रमांक तपासून पाहण्यासाठी सर्वात प्रथम UIDAI ची वेबसाईट uidai.gov.in वर भेट द्या.
-वेबसाईट सुरु झाल्यानंतर तेथे आधार कार्ड संबंधित काही सुविधा दाखवल्या जातील. जसे Verify, Email/Mobile Number वेरिफाय करण्याचे ऑप्शन दाखवले असल्यास तेथे क्लिक करा. येथे क्लिक केल्यानंतर तुमच्याकडून काही महत्वाची माहिती मागितली जाईल.
-त्यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाकावा लागणार आहे. तसेच रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक माहिती करुन घेण्यासाठी मात्र तुम्हाला आधार कार्ड क्रमांक द्यावा लागणार आहे.
-आधार कार्ड क्रमांक दिल्यानंतर मॅन्युअली क्रमांक देऊन क्रॉस चेक करु शकता. आधार कार्ड सोबत लिंक असण्याची शक्यता असलेला मोबाईल क्रमांक टाकून तपासून पाहू शकता.(पॅनकार्डला आधार कार्ड करा लिंक; अगदी सोप्या पद्धतीने)
-क्रॉस चेक करताना तेथे दाखण्यात आलेला मोबाईल क्रमांक आधार कार्डला लिंक आहे. तर ईमेल आयडीवर एक OTP सुद्धा येईल हा ओटीपी दिल्यानंतर तुम्हाला वेरिफाय करावे लागणार आहे. या सोप्प्या टीप्स वापरुन तुम्हाला आधार कार्ड सोबत कोण रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक तपासून पाहता येणार आहे.
आधार कार्डवरील तुमचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक तपासून पाहण्यासाठी तुम्ही आधार कार्ड केंद्रावर ही जाऊ शकता. परंतु यासाठी तुम्हाला प्रथम ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. UIDAI च्या वेबसाईटवर जाऊन तेथे दिलेल्या My Aadhar आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर तेथे Get Aadhar मध्ये Book An Appointment वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तारीख आणि कोणत्या वेळी जायचे आहे ते सांगू शकता. निवडलेल्या तारखेला आणि वेळेच्या दिवशी तुम्ही आधार केंद्रावर जाऊन तुमचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक कोणता आहे ते तपासून पाहू शकता.