रेल्वे तिकिटाचे टेंन्शन? या सोप्या पद्धतीने करा आरक्षण

तसेच रेल्वे तिकिट घराच्या बाहेर ही लांब लचक प्रवाशांची गर्दी दिसून येते. परंतु तुम्ही घरबसल्या रेल्वेचे तिकिट अगदी काही वेळातच ऑनलाईन पद्धतीने आरक्षण करु शकता.

Express Trains | (Photo Credit: Archived, Edited, Representative Images)
 सणासुदीच्या काळात रेल्वेचे तिकिट मिळणे थोडे मुश्किलच असते. तसेच रेल्वे तिकिट घराच्या बाहेर ही लांब लचक प्रवाशांची गर्दी दिसून येते. परंतु तुम्ही घरबसल्या रेल्वेचे तिकिट अगदी काही वेळातच ऑनलाईन पद्धतीने आरक्षण करु शकता. त्यामुळे रेल्वे स्थानकात जाऊन तिकिट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचेल आणि डिजिटल पद्धतीला ही चालना मिळेल.
रेल्वेचे तिकिट बुकिंग करण्यासाठी प्रथम www.irctc.co.in  या रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे. त्यानंतर तेथे तुम्हाला Log In असा ऑप्शन दाखवला जाईल. तेथे तुमचा लॉगिन आयडी किंवा नसल्यास प्रथम रजिस्ट्रेशन करावे. यासाठी तुम्हाला मोबाईल क्रमांक, नाव, इमेल आयडी आणि पत्ता यांची माहिती देणे आवश्यक आहे. तर जाणून घ्या कशा पद्धतीने तुम्ही अवघ्या 10-15 मिनिटात रेल्वे तिकिटाचे बुकिंग करु शकता.
- आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर लॉगिन केल्यावर Book Your Ticket असे दाखवले जाईल. त्यामध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी प्रवास करायचा आहे त्याबद्दल माहिती द्यावी लागेल. Form म्हणजे ज्या ठिकाणाहून तुम्हाला रेल्वे पकडायची असेल त्या ठिकाणाचे नाव आणि To म्हणजे ज्या ठिकाणी तु्म्हाला उतरायचे त्या ठिकाणचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी प्रवास करायचा आहे त्या दिवसाची तारीख ऑप्शनवर क्लिक करुन Find Trains वर क्लिक करा.
-त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही जाणार असाल त्या दिवसासाठी कोणती ट्रेन उपलब्ध आहे याची माहिती तुम्हाला दाखवली जाईल. तसेच रेल्वेच्या विविध क्लास नुसार त्याचे किती पैसे हे सुद्धा दाखवले जाईल. हे पाहण्यासाठी तुम्ही Cheack Availability and Fare ऑप्शनवर क्लिक करुन पाहू शकता.
-जी ट्रेन, क्लास किंवा कोणत्या कोट्यामधून तुम्हाला तिकिट बुकिंग करायची आहे ते पहा त्यानंतर Book Now या ऑप्शनवर क्लिक करा.
-या प्रक्रियेनंतर एक नवीन विंडो सुरु होऊन तुम्हाला त्यामध्ये प्रवाशाचे नाव, वय, लिंग, मोबाईल क्रमांकसह अन्य माहिती द्यावे लागणार आहे. तसेच खाली दिलेल्या कॅप्चा कोड भरुन Continue Booking वर क्लिक करा.
-तसेच फॉर्म भरल्यानंतर पुन्हा एकदा तपासून पहा आणि त्यानंतरच तिकिटाचे पैसे भरा. तिकिटाचे पैसे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डेबिट, क्रेडिट कार्डसह अन्य मोबाईल वॉलेट पद्धतीने भरु शकता.

-पैसे भरल्यानंतर तुमचे तिकिट कन्फर्म होईल. त्यानंतर तुम्हाला मोबाईलवर  तिकिट कन्फर्म झाल्याचा एक मेसेज येईल. एवढेच नाही ऑनलाईन पद्धतीने आलेली रेल्वे तिकिटाची तुम्ही प्रिंट काढू शकता.(दिवाळी निमित्त रेल्वेकडून सोडण्यात येणार जादा ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक)

तसेच रेल्वे प्रशासनाकडून तिकिट आरक्षणाबाबत काही नियमात बदल केले आहेत. त्यानुसार प्रवाशांना आता तिकिटांचे आरक्षण किंवा रद्द करण्यासाठी काय करावे हे सांगण्यात आले आहे.