COVID-19 Vaccination For 18-44 Age Group in India: भारतात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींनी CoWin Portal वर आपल्या पहिल्या कोरोना लसीकरणाची नोंदणी कशी करावी?
ही माहिती भरण्यासाठी पुढे दिलेल्या टिप्स फॉलो करा.
येत्या 1 मे 2021 पासून भारतात 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींना कोरोना लस (COVID-Vaccine) देण्यात येणार आहे. कोरोनाविरुद्धचा भारताचा लढा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी कोरोनाची लस घेणे आवश्यक आहे. यासाठी CoWin पोर्टलवर जाऊन या लोकांना ऑनलाईन नोंदणी करायची आहे. त्यानुसार त्यांना त्यांच्या जवळील भागात लसीकरण घेण्यासंबंधी माहिती देण्यात येईल. तिस-या टप्प्यातील या कोरोना लसीकरणाच्या मोहिमेविषयी अनेकांच्या मनात संभ्रम आहे ते म्हणजे याचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करायचे? तुमच्या मनातील हा संभ्रम दूर करण्यासाठी हा लेख तुमची मदत करेल.
कोरोनाची लस घेण्यासाठी 18 ते 44 वयोगटातील लोकांनी सर्वात आधी कोविन पोर्टलवर जाऊन स्वत:ची माहिती देऊन नोंदणी करायची आहे. ही माहिती भरण्यासाठी पुढे दिलेल्या टिप्स फॉलो करा.हेदेखील वाचा- भारतात कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट! गेल्या 24 तासात 3,79,257 रुग्ण, तर 3645 जणांचा मृत्यू
- CoWIN portal www.cowin.gov.in. ला भेट द्या.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकाने लॉग इन करा आणि तुमची माहिती भरून Submit करा. तुम्हाला 'Schedule appointment' टॅब दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळील परिसरात असलेल्या लसीकरण केंद्रांची यादी मिळेल. तुमचे जवळचे लसीकरण केंद्र निवडून त्यातील तुमच्या सोयीनुसार, वेळ निवडा
- त्यानंतर नोंदणी केलेल्या तारखेला निवडलेल्या वेळेनुसार, निवडलेल्या ठिकाणी जाऊन लस घ्या.
- नागरिक एका मोबाईलवरुन तिघांची नोंदणी करु शकता.
- जर तुम्ही ठरलेल्या दिवशी वा ठरलेल्या वेळेत लस घेण्यास जाऊ शकलात नाही, तर तुम्ही तेथे जाऊन Cancel किंवा Reschedule पर्याय निवडू शकता.
देशात 15 जानेवारी 2021 मध्ये कोरोना लसीकरण मोहिम सुरु झाली. यात Covaxin आणि CoviShield असे दोन लस ठेवण्यात आले. तसेच प्रत्येकाला लसीकरणाचे दोन टप्पे पार पाडावे लागतात. तेव्हाच त्यांचे लसीकरण पूर्ण होते.
दरम्यान आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला असून गेल्या 24 तासात 3,79,257 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तसेच 3645 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 2,69,507 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.