How Build an Emergency Fund: जागतिक मंदीची चिंता सतावतेय? आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आर्थिक नियोजन कसे करावे?
या पार्श्वभूमीवर भविष्यात जर आपल्यावरही अशी वेळ आली तर काय कराल? म्हणून आतापासूनच योग्य पद्धतीने आर्थिक नियोजन (Financial Planning) करण्यास सुरुवात करा.
Financial Management For an Emergency Fund: गभरातील मातब्बर कंपन्या संभाव्य जागतिक मंदीच्या (Global Recession) पार्श्वभूमीवर सावध पावले टाकत आहेत. संभाव्य संकटाला सामोरे जाण्याच्या नावाखाली कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा सपाटाच लावला आहे. त्यामुळे जगभरातील अनेक नामवंत कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले जात आहे. विशेष म्हणजे अत्यंत सुरक्षीत आणि आंतरराष्ट्रीय मानल्या जाणाऱ्या कंपन्यांनी हे धोरण आखल्याने छोट्या आणि स्थानिक कंपन्यांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही नोकरी गमावण्याची चिंता सतावत आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात जर आपल्यावरही अशी वेळ आली तर काय कराल? म्हणून आतापासूनच योग्य पद्धतीने आर्थिक नियोजन (Financial Planning) करण्यास सुरुवात करा.
आर्थिक नियोजन कसे कराल?
आर्थिक स्थितीचे अवलोकन: सद्याच्या आर्थिक परिस्थितीचे मूल्यांकन करा. जेणेकरुन तुमचे उत्पन्न, खर्च आणि कर्जे यांचा आढावा घेऊन सुरुवात करा. किती पैसे येत आहेत आणि किती बाहेर जात आहेत हे समजून घ्या. (हेही वाचा, Post Office RD: पोस्टात आरडी केल्यास किती मिळतो परतावा? पाच वर्षांसाठी 5000 गुंतवल्यास किती फायदा? घ्या जाणून)
आपत्कालीन निधी तयार करा: संभाव्य आर्थिक संकटांना तोंड देण्यासाठी आर्थिक बाबींचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. ज्यामुळे आर्थिक संकटांचा सामना करण्यास सोपे जाते. त्यासाठी काहीही न करता किमान तीने ते सहा महिने कुटुंब व्यवस्थित जीवन आणि चरितार्थ सुरु ठेवेल या उद्देशाने नियोजन (आर्थिक) करा.
आर्थिक ताळेबंद करा: तुमचे सध्याचे उत्पन्न, खर्च आणि कर्जे विचारात घेऊन ताळेबंद तयार करा. तुम्ही तुमच्या अर्थाच्या मर्यादेत जगत आहात याची खात्री करण्यासाठी तुमचे बजेट आवश्यकतेनुसार लवचिक बनवा.
अनावश्यक खर्चात कपात करा: तुमच्या खर्चाचा आढावा घ्या आणि तुम्ही कुठे आणि किती कपात करू शकता ते पहा. मनोरंजन खर्च, हॉटेलचे जेवण, अनावश्यक खरेदी टाळण्यावर विचार करा. त्यावर भरद्या.
उत्पन्नाच्या पर्यायी स्रोतांचा विचार करा: तुम्ही तुमची नोकरी गमावली असल्यास किंवा ती गमावण्याची काळजी वाटत असल्यास, उत्पन्नाच्या इतर स्रोतांचा वापर करण्याचा विचार करा. यामध्ये ऑनलाइन वस्तू विकणे किंवा अर्धवेळ नोकरी शोधणे , छोटा व्यवसाय सुरु करणे असे पर्याय असू शकतात.
कर्ज परतफेडीला प्राधान्य द्या: प्रथम तुमचे सर्वाधिक व्याज असलेले कर्ज फेडण्याचा विचार करा. तुम्ही तुमच्या कर्जदारांसोबत कमी व्याजदर किंवा कमी पेमेंट योजनेबाबत वाटाघाटी करू शकता. जेणेकरुन संभाव्य परिस्थितीत मोकळा श्वास घेणे आणि ताणमूक्त राहणे शक्य होईल.