Patna Railway Station जवळ हॉटेलला आग, 6 ठार; 20 जणांची सुटका

या घटनेत 10 हून अधिक लोक जखमी झाल्याचे समजते. तर बचावकार्यादरम्यान 20 हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी आणण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Fire | Images for symbolic purposes only । (Photo Credits: Pixabay)

Fire At Hotel Near Patna Railway Station: पाटणा जंक्शन रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलला गुरुवारी (25 एप्रिल) लागलेल्या आगीत किमान सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत 10 हून अधिक लोक जखमी झाल्याचे समजते. तर बचावकार्यादरम्यान 20 हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी आणण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. रेल्वे स्थानकानजीक असलेल्या तीन इमारतींना आग लागल्याने ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

पाटणा येथील घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. तर, हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्यावत्तानुसार आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या हॉटेल पालमध्ये एका पुरुषाचा तर हॉटेल अमितमध्ये एक महिला आणि तिच्या मुलीचे मृतदेह सापडले. एका इमारतीला लागलेली आग जोरदार वाऱ्यामुळे जवळच्या इमारतींमध्ये त्वरीत पसरली. ज्यामुळे कार, मोटारसायकल आणि ऑटो-रिक्षांसह अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 7-8 अग्निशमन दल आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांहून अधिक काळ अथक परिश्रम घेतल्यानंतरही आग आटोक्यात आणणे आव्हानात्मक ठरले. अखेर प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर ही आग आटोक्यात आली. (हेही वाचा, Uttar Pradesh News: आगीसोबत स्टंट जीवाशी बेतला, तरुणाचा चेहरा भाजला; घटनेचा Video व्हायरल)

वरिष्ठ पोलिस अधीक्षक राजीव मिश्रा यांनीपीटीआयशी बोलताना देताना सांगितले की, अग्निशमन दलाने 20 हून अधिक लोकांना आगीत उद्ध्वस्त झालेल्या इमारतींमधून वाचवले आहे. मृतांची ओळख अद्याप निश्चित झालेली नाही आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात तातडीने वैद्यकीय उपचार मिळत आहेत. घटनास्थळी दाखल झालेले डीआयजी (अग्निशमन) मृत्युंजय कुमार चौधरी यांनी आग आटोक्यात आणल्याची पुष्टी केली. ते म्हणाले आगीचे कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी केली जाईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. (हेही वाचा, Mumbai Fire Broke Out: मुंबईतील रे रोड परिसरात एका गोदामाला भीषण आग (Video))

दरम्यान, एका मुंबईतील एका किराणा दुकानाला लागलेल्या आगीत जळून जखमी झालेल्या एका ७० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. पीटीआयच्या वृत्तानुसार ही आग अँटॉप हिलच्या जय भवानी नगर भागात असलेल्या एक मजली दुकानात बुधवारी रात्री 11:54 वाजता आग लागली. पन्नालाल वैश्य असे पीडितेचे नाव आहे. आग लागलेल्या दुकानाच्या वरच्या भागात तो अडकला होता. प्रत्यक्षदर्शींनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली की त्यांच्या आगमनापूर्वी इमारतीच्या वरच्या मजल्यावर दोन सिलेंडरचे स्फोट झाले. आगीत प्रामुख्याने इलेक्ट्रिक वायरिंग, घरगुती वस्तू आणि किराणा मालाचे जमिनीवर आणि वरच्या मजल्यावरील नुकसान झाले.