Horrifying Videos: लहान मुलांच्या गुदाशयात मिरची कोंबली, मूत्र प्राशन करण्यासाठी दबाव

इतकेच नव्हे तर नराधमांनी त्यांच्या गुप्तांगात मिरची कोंबली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रसारमाध्यमांनीही याबाबत वृत्त दिले आहे.

Horrifying Videos | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील सिद्धार्थनगर (Siddharthnagar) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना पुढे येत आहे. ज्यामुळे मानवतेलाही लाज वाटेल. हे. पाथरा पोलीस (Pathra Police Station) ठाण्याच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुलांवर अत्याचार करण्यात आल्याचे समजते. पीडित दोन्ही मुले अल्पवयीन असून त्यांच्यावर मूत्र प्राशन करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. इतकेच नव्हे तर नराधमांनी त्यांच्या गुप्तांगात मिरची कोंबली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रसारमाध्यमांनीही याबाबत वृत्त दिले आहे.

पीडित मुलांवर परिसरातील एका पोल्ट्री फार्ममध्ये कोंबीड चोरण्याच्या उद्देशाने घुसल्याचा आरोप आहे. आरोपींनी त्यांच्यावर कोंबडी चोरण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न करताना रंगेहात पकडल्याचा आरोप करत त्यांना मारहाण केली. त्यांच्यासोबत अतिषय घाणेरडे कृत्य केले. आरोपींनी पीडितांना लघवी पाजली तसेच त्यांच्या गुदाशयात मिरची टाकण्याचा क्रूरपणाही केला. या घटनेमुळे जबरदस्त मानसिक धक्का बसलेली मुलांची प्रकृती बिघडली आहे.

विकृत कृत्य कॅमेऱ्यात कैद

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे की, पीडित मुलाच्या गुदाशयात मिरची कोंबली जात आहे. त्यानंतर वेदनेने तळमळणाऱ्या त्या मुलाला बाटलीतून लघवी प्यायला दिली जात आहे. पीडितांपैकी एक मुलगा 6 तर दुसरा 7 वर्षे वयाचा असल्याचे समजते. तर या एकूण सहा आरोपींनी त्यांच्यावर अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सुमारे सहा जणांना अटक केली असून तपास सुरू आहे. (हेही वाचा, रत्नागिरी: लहान मुलांवर 2 वर्षांपासून अनैसर्गिकरित्या लैगिंक अत्याचार करणाऱ्या एका नराधमास अटक)

व्हिडिओ

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, बुधवारी शेतातून 2,000 रुपये बेपत्ता झाल्यानंतर आणि कोंबडी चोरण्याच्या कृत्यात कथीतरित्या पकडल्यानंतर मुलांना शिक्षा करण्यात आली. संशयाच्या आधारे शेतमालकांनी मुलांना चहा देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. नंतर त्यांच्यासोबत असे क्रूर कृत्य केले. ज्यामुळे लोकांच्या आत्म्याला धक्का बसला आणि या घृणास्पद कृत्याचे कॅमेरात चित्रीकरणही केले.

व्हिडिओ

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी एएनआयला सांगितले की, "सोशल मीडियावर एक व्हायरल व्हिडिओ दोन अल्पवयीन मुलांसोबत आक्षेपार्ह कृत्यांबाबत ठाणे पाथरा बाजारमध्ये निदर्शनास आला आहे. व्हायरल व्हिडिओची दखल घेतल्यानंतर संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.



संबंधित बातम्या

NZ vs ENG 3rd Test 2024 Day 4 Live Streaming: न्यूझीलंड विजयापासून 8 विकेट दूर, जाणून घ्या चौथ्या दिवसाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहायचे

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील