पाकिस्तानाच्या ISI ला लढाऊ विमानांची माहिती पुरवल्याप्रकरणी Hindustan Aeronautics च्या कर्मचाऱ्याला अटक
या प्रकरणी संबंधित कर्चमाऱ्याला अटक केल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.
हिंदुस्तान एयरोनॉटिक्स (Hindustan Aeronautics) च्या एका कर्मचाऱ्याने पाकिस्तानच्या (Pakistan) इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस (Inter- Services Intelligence) ला लढाऊ विमानांची माहिती पुरवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित कर्चमाऱ्याला अटक केल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) दिली आहे. एटीएसच्या (ATS) नाशिक (Nashik) युनिटमधील HAL कर्मचाऱ्याने भारतीय लढाऊ विमानांची आणि त्यांच्या निर्मितीची गोपनीय माहिती पाकिस्तानाच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस ला पुरवली. त्यानंतर त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली.
एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्तान एयरोनॉटिक्सचा एक कर्मचारी सतत पाकिस्तानी आयएसआयच्या संपर्कात आहे. अशी माहिती नाशिकच्या एटीएसला विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. HAL चा कर्मचारी भारतीय लढाऊ विमानांबद्दलची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवत होता. त्याचप्रमाणे एचएएलच्या नाशिक मधील ओझर जवळील विमाने उत्पादनाच्या युनिटबद्दलची माहिती पाकिस्तानला पुरवण्याचे त्याचे काम सुरु होते. (Nashik: पाकिस्तानी व्हॉट्सअॅप ग्रुपवर देवलाली येथील मिलिट्री कॅम्प चे फोटोज पाठवल्याप्रकरणी एका युवकाला अटक)
PTI Tweet:
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिक जवळील देवलाली येथील मिलिट्री कॅम्पचे फोटोज पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केल्याप्रकरणी एका 21 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली होती. संजीव कुमार असे या युवकाचे नाव असून तो बिहार मधील गोपालगंज येथील रहिवासी होता. नाशिक मधील देवलाली येथील मिलिट्री कॅम्पमध्ये स्कूल ऑफ आर्टिलरी, आर्टिलरी सेंटर आणि कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल सारख्या संरक्षण आस्थापने आहेत. या मिलिट्री कॅम्पच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे फोटो काढण्यास किंवा व्हिडिओग्राफी करण्यास सक्त मनाई आहे.