High-Rise Buildings in Mumbai: मुंबईमधील गगनचुंबी इमारती परिवर्तनासाठी सज्ज; बिल्डिंगच्या उंचीची मर्यादा 180 मीटरपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव, उभे राहू शकतात 50-60 मजले

उद्योग क्षेत्रातील बड्या लोकांनी उंच इमारतींचे पर्यावरणीय फायदे देखील अधोरेखित केले. सिद्धा ग्रुपचे संचालक सम्यक जैन यांनी नमूद केले की, या अशा उभ्या विकासामुळे शहरांचा विस्तार कमी होतो आणि ऊर्जा कार्यक्षमता सुधारते.

High-Rise Buildings in Mumbai

दिल्ली, पुणे, हैद्राबाद, बंगळुरू अशा शहरांच्या तुलनेत मुंबई (Mumbai) शहर उभ्या पद्धतीने वाढत आहे. म्हणजेच मुंबईत गगनचुंबी इमारतींची संख्या झपाट्याने वाढत आहे. जागेची कमतरता आणि वाढती लोकसंख्या यामुळे मुंबईतील बांधकामे आडवी न वाढता उभी वाढण्याचा ट्रेंड दिसून येतो. आता महाराष्ट्र सरकारने उच्च-उंचीच्या इमारतींसाठी उंचीची मर्यादा 120 मीटरवरून 180 मीटरपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावानुसार, 50 ते 60 मजल्यांपर्यंतच्या इमारती बांधण्यास परवानगी मिळू शकते. परंतु बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) तांत्रिक समितीकडून मंजुरी मिळणे बाकी आहे. जर असे घडले तर, शहरातील उंच इमारतींना लक्षणीयरीत्या वेगळा आकार मिळेल.

मुंबईची उभी वाढ ही जागेच्या उपलब्धतेनुसार आणि तांत्रिक प्रगतीनुसार पुढे जात राहिली आहे, त्यामुळे आता रिअल इस्टेट क्षेत्राने या निर्णयाचे स्वागत केले आहे, कारण या निर्णयामध्ये मंजुरी सुलभ करण्याची, जमिनीचा वापर अनुकूल करण्याची आणि उभ्या विस्ताराद्वारे मुंबईतील जागेची कमतरता दूर करण्याची क्षमता आहे. एनएआरईडीसीओ महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रशांत शर्मा यांनी याला एक गेम-चेंजर म्हटले आहे, ज्याद्वारे प्रकल्पांच्या वेळेत गती देईल आणि व्यवसाय करण्याची सुलभता सुधारली जाईल. ट्रान्सकॉन डेव्हलपर्सच्या संचालक श्रद्धा केडिया-अगरवाल यांनी भर दिला की, शहराचा आडवा विस्तार न करता उभ्या जागेचा जास्तीत जास्त वापर करणे हे शाश्वत शहरी विकासासाठी महत्त्वाचे आहे.

उद्योग क्षेत्रातील बड्या लोकांनी उंच इमारतींचे पर्यावरणीय फायदे देखील अधोरेखित केले. सिद्धा ग्रुपचे संचालक सम्यक जैन यांनी नमूद केले की, या अशा उभ्या विकासामुळे शहरांचा विस्तार कमी होतो आणि ऊर्जा कार्यक्षमता सुधारते. सुगी ग्रुपचे संस्थापक निशांत देशमुख यांचा असा विश्वास आहे की, या निर्णयामुळे वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी प्रीमियम राहण्याची जागा निर्माण होईल, तर त्रिधातु रिअॅल्टीचे एमडी गोविंद कृष्णन मुथुकुमार याकडे एक नाविन्यपूर्ण, शाश्वत डिझाइनसाठी संधी म्हणून पाहतात. (हेही वाचा: MHADA: म्हाडा पुढील 5 वर्षात 8 लाख घरे बांधणार; महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची माहिती)

मात्र, तज्ञांनी समांतर पायाभूत सुविधांच्या सुधारणांची गरजही अधोरेखित केली. सीसीआय प्रोजेक्ट्सचे संचालक रोहन खटाऊ यांनी वाढत्या लोकसंख्येच्या घनतेला आधार देण्यासाठी वाहतूक, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनात सुधारणा करण्याचे आवाहन केले. एसडीपीएलचे सीओओ अभिषेक जैन म्हणाले की, अशी आधुनिक आणि प्रशस्त घरे ग्राहकांच्या बदलत्या गरजांशी सुसंगत असली पाहिजेत. दरम्यान, जर हे धोरण मंजूर झाले तर मुंबईत उंच इमारतींमध्ये राहण्याचे एक नवीन युग सुरू होऊ शकते, परंतु त्याचे यश काळजीपूर्वक नियोजन, पायाभूत सुविधांची तयारी आणि शाश्वततेच्या नियमांचे पालन यावर अवलंबून असेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now