IPL Auction 2025 Live

Tamil Nadu Rain: तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस सुरूच, ट्रेन रद्द, 2 जिल्ह्यातील शाळा बंद

कोईम्बतूरमधील कुंजप्पा-पनईजवळील रस्त्यावर आणि कोटागिरी मेट्टुपलायम प्रदेशातील मेट्टुपालयम महामार्गावर भूस्खलन झाले.

Rain (PC - Twitter/ ANI)

तामिळनाडूच्या (Tamil Nadu Rain) अनेक भागांमध्ये ईशान्य मान्सूनचा जोर वाढल्याने मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरूच आहे. अनेक ठिकाणांहून भूस्खलनाची नोंद करण्यात आली आहे, तसेच मोठ्या प्रमाणावर पुराचा धोका आहे. शुक्रवारी राज्यातील किमान 12 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. सध्याची परिस्थिती पाहता दोन जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तिरुवरूर जिल्ह्यातील आणि पुद्दुचेरीतील कराइक्कलमधील शाळा आजपासून बंद राहणार आहेत.  (हेही वाचा - Delhi Air Pollution: दिल्लीत रात्रभर पडलेल्या पावसामुळे हवेची गुणवत्ता सुधारली, आज पुन्हा पावसाची शक्यता)

चेन्नईतील IMD ने तंजावर, तिरुवरूर, नागापट्टिनम, मायालादुथुराई, पुदुकोट्टई, शिवगंगाई, रामनाथपुरम, विरुधुनगर, थुथुकुडी, थेंकसी, तिरुनेलवेली आणि कन्नियाकुमारी यांसारख्या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे, असे प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितले.

निलगिरी माउंटन रेल्वेच्या कल्लर आणि कुन्नूर विभागांमधील ट्रॅकवर भूस्खलन आणि झाडे पडल्यामुळे, रेल्वेने 16 नोव्हेंबरपर्यंत दोन सेवा रद्द केल्या आहेत. अधिका-यांनी माहिती दिली आहे की, 06136 आणि 06137 या पॅसेंजर स्पेशल ट्रेन, मेट्टुपलायम ते उदगमंडलम आणि त्याउलट 10 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत.

गुरुवारी मदुराई, कोईम्बतूर आणि थुथुकुडीसह अनेक शहरांमध्ये तीव्र पाणी साचले होते. कोईम्बतूरमधील कुंजप्पा-पनईजवळील रस्त्यावर आणि कोटागिरी मेट्टुपलायम प्रदेशातील मेट्टुपालयम महामार्गावर भूस्खलन झाले. गुरुवारी कोईम्बतूर, तिरुपूर, मदुराई, थेनी आणि दिंडीगुल जिल्ह्यात शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. हवामानाच्या अंदाजानुसार, कोमोरिन क्षेत्रावरील चक्रीवादळ आणि जोरदार पूर्व/ईशान्येकडील वारे, पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र हे राज्यातील तीव्र पर्जन्यमानाचे प्रमुख घटक आहेत.