Heatwave Alert: उत्तर भारतात उष्णतेची लाट; यूपीमध्ये 33 जणांचा मृत्यू, बिहारमध्ये तापमानाने 128 वर्षांचा विक्रम मोडला; जाणून घ्या IMD हवामान अंदाज
उत्तर भारत उष्णतेच्या लाटेने (Heatwave Alert) होरपळत आहे. सूर्य आग ओकत असल्याने तापमान प्रचंड वाढले आहे. परिणामी प्रचंड गर्मीमुमळे उत्तर प्रदेश राज्यात 33 जणांचा मृत्यू झाला आहे. तर बिहारमध्ये तापमान तब्बल 128 वर्षांचा विक्रम मोडला आहे. उष्णतेची लाट (Heatwave) आणि त्याचे परिणाम पाहता सुरक्षीततेचा उपाय म्हणून सकाळी 10 वाजलेपासूनच अनेक ठिकाणी कर्फ्यू लावला जात आहे.
North India Weather Forecast: उत्तर भारत उष्णतेच्या लाटेने (Heatwave Alert) होरपळत आहे. सूर्य आग ओकत असल्याने तापमान प्रचंड वाढले आहे. परिणामी प्रचंड गर्मीमुमळे उत्तर प्रदेश राज्यात 33 जणांचा मृत्यू झाला आहे. तर बिहारमध्ये तापमान तब्बल 128 वर्षांचा विक्रम मोडला आहे. उष्णतेची लाट (Heatwave) आणि त्याचे परिणाम पाहता सुरक्षीततेचा उपाय म्हणून सकाळी 10 वाजलेपासूनच अनेक ठिकाणी कर्फ्यू लावला जात आहे. पुढचे काही दिवस या राज्यांमध्ये स्थिती अशीच राहील असे आयएमडी हवामान अंदाज (IMD Weather Forecast) वर्तवताना सांगत आहे. त्यामुळे मान्सून पाऊस केव्हा बरसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बर्फाच्छादित शहरामध्ये पहिल्यांदाच तापमान वाढ
उत्तर भारतात निर्माण झालेली उष्णतेची लाट तापमानवाढीस कारणीभूत ठरत आहे. अगदी सामान्यतः थंड डोंगराळ भागातही अभूतपूर्व उष्णतेचा अनुभव येत आहे. पिथौरागढ जिल्ह्यातील 7,200 फूट उंचीवर असलेल्या मुन्सियारी या बर्फाच्छादित शहरामध्ये तापमानाने पहिल्यांदाच 31 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. आठवड्याच्या शेवटी, मुन्सियारीमध्ये शनिवारी तापमान 32 अंश सेल्सिअस आणि रविवारी 31 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले. ज्याने पूर्वीचे विक्रम आणि नोंदी मोडून काढल्या. ही असामान्य उष्णता इतर भौगोलिकदृष्ट्या उंच असलेल्या प्रदेशांमध्येही पाहायला मिळतते. खास करुन गुंजी ते कैलास, पंचचुली आणि मिलम बेस कॅम्प पर्यंतचे क्षेत्र, 10,000 ते 15,000 फूट दरम्यान वसलेले आहे. या प्रदेशामध्ये दिवसा उष्णतेमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. (हेही वाचा, Heatwaves Impact the Indian Economy: उष्णतेच्या लाटेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम; उत्पादकता घटल्याने महागाई वाढण्याची चिन्हे)
हिमनद्या आणि इतरही नद्यांवर परिणाम
उष्णतेच्या लाटेमुळे हंगामी हिमनद्या लवकर वितळल्यामुळे मिलम हिमनदीतून उगम पावणाऱ्या गोरी गंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
लॅन्सडाउन आणि इतर हिल स्टेशन
या भागातील इतर हिल स्टेशनलाही उष्णतेच्या लाटेने वेढले आहे. लॅन्सडाऊनमध्ये तापमानाने 32 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे, तर धानोल्टीमध्ये तापमान 31 अंशांच्या पुढे गेले आहे. याउलट, औलीच्या लोकप्रिय स्की रिसॉर्टमधील तापमान 21 अंश सेल्सिअस तुलनेने थंड राहते. (हेही वाचा, Weather Update: उष्णतेच्या लाटेत पावसामुळे दिलासा, अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट अजूनही कायम)
हिमाचल प्रदेश उष्णतेची लाट
हिमाचल प्रदेशमध्ये, हवामान खात्याने पुढील दोन दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेच्या स्थितीसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केले आहेत. किन्नौर आणि लाहौल स्पिती वगळता उर्वरित 10 जिल्ह्यांमध्ये रविवारी तीव्र उष्णता जाणवली.
पंजाब राज्यातही उष्णतेची लाट
पंजाब आणि हरियाणाच्या मैदानी भागातही परिस्थिती तितकीच भीषण आहे. रविवारी पंजाबमधील लुधियाना, पटियाला, चंदीगड आणि अमृतसर या चार जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेने ग्रासले होते. लुधियानामध्ये 47.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, जे 1958 नंतरच्या प्रदेशातील सर्वाधिक तापमान आहे, तर पठाणकोटमध्ये 47.1 अंश सेल्सिअस तापमान होते.
हरियाणा मध्येही उष्णतेची लाट
हरियाणामध्येही उष्णतेची लाट कायम असून रविवारी फरीदाबादचे तापमान46.4 अंश सेल्सिअसवर पोहोचले. किमान तापमानही कमाल, 32 अंश सेल्सिअसच्या वर राहिल्याने अस्वस्थता वाढली आहे.
दरम्यान, उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम असली तरी क्षितिजावर आशेची किरण दिसू लागली आहेत. 18 जूनपासून ढगांच्या गडगडाटासह तुरळक रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शिवाय, 19 ते 21 जून या कालावधीत पावसाची शक्यता आहे, ज्यामुळे तापलेल्या प्रदेशांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)