भारतातील COVID-19 Hotspots नुसार राज्यातील जिल्हे आणि शहरांची रेड, ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये विभागणी; येथे पाहा संपूर्ण यादी

कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार जिल्हे रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये विभागण्यात आले आहेत.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारत देश सध्या कोरोना व्हायरस संकटाच्या सावटाखाली आहे. देशात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध स्तरांवर प्रयत्न करत आहेत. तसंच अनेक उपाययोजना, पॅटर्न्स राबवले जात आहेत. कोविड 19 च्या भयंकर संकटाचा सामना करणे सुसह्य व्हावे म्हणून आरोग्य मंत्रालयाने जिल्ह्यांची विविध झोन्समध्ये विभागणी केली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार जिल्हे रेड (Red), ग्रीन (Green) आणि ऑरेंज (Orange) झोन मध्ये विभागण्यात आले आहेत.

जिल्हांच्या विभागणीची यादी ही कोरोना रुग्णांची वाढती संख्या, रुग्ण वाढण्याचे प्रमाण आणि तपासणींची संख्या यानुसार करण्यात आली आहे. या सर्व बाबी लक्षात घेत प्रत्येक राज्यातील कोणता जिल्हा कोणत्या झोनमध्ये आहे हे यादीत सांगण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने तयार केलेल्या या यादीत देशातील 319 जिल्हे ग्रीन झोन मध्ये आहेत. तर 134 जिल्ह्यांचा रेड झोनमध्ये समावेश असून तब्बल 284 जिल्हे ऑरेंज झोनमध्ये आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या सचिव प्रीती सुदन (Union Health Secretary Preeti Sudan) यांनी झोननुसार असणाऱ्या जिल्ह्यांची यादी जारी केली आहे. (भारतातील कोरोना बाधितांनी गाठला 35000 चा टप्पा; मागील 24 तासांत 1993 नव्या रुग्णांची भर)

दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, कोलकता, हैद्राबाद आणि अहमदाबाद या राजधानी शहरांसह सर्व मेट्रो शहरांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील 14 जिल्हे, दिल्लीतील सर्व 11 जिल्हे, उत्तर प्रदेशातील 19, तामिळनाडू मधील 12, पश्चिम बंगाल मधील 10, मध्य प्रदेशातील 9 आणि राजस्थान मधील 8 जिल्ह्यांचा रेड झोनमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.

ऑरेंज झोन मधील जिल्हे- उत्तर प्रदेश- 36, तामिळनाडू- 24, बिहार- 20, राजस्थान 19, पंजाब- 15, मध्य प्रदेश 19, महाराष्ट्र 16.

ग्रीन झोनमधील जिल्हे- उत्तर प्रदेश 20, उत्तराखंड- 10, छत्तीसगढ- 25, अरुणाचल प्रदेश- 25 आणि ओडिशा 21.

उत्तर प्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, त्रिपूरा आणि राजस्थान मधील जिल्ह्यांची यादीः

पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, जम्मू-काश्मीर, नागालॅंड मधील जिल्ह्यांची यादी:

छत्तीसगड, आसाम,  बिहार, आंध्र प्रदेश मधील जिल्ह्यांची यादी:

नव्या नियमांनुसार, 21 दिवसांपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा एकही नवा रुग्ण न आढळल्यास त्या जिल्ह्याचा अंतर्भाव ग्रीन झोनमध्ये होतो. यापूर्वी हा कालावधी 28 दिवसांचा होता. लॉकडाऊनचा दुसरा टप्पा लवकरच संपणार आहे. तरी देखील अजूनही देशातील 130 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत.