पंचकुल हॉस्पिटल मध्ये पेशंट ला MRI मशीन मध्ये टाकून रुग्णालयाचे कर्मचारी विसरले; सुदैवाने वाचला जीव

या हॉस्पिटलमध्ये एमआरआय करून घेण्यासाठी आलेल्या एका रुग्णाला एमआरआय सेंटर मधील कर्मचारी चक्क स्कॅनिंग मशीन मध्येच विसरले.

MRI Image For Representation (Photo Credits: Pixabay)

आजवर तुम्ही डॉक्टरांच्या अनावधानाने पेशंटच्या पोटात कात्री, स्टेथस्कोप राहिल्याचे किस्से नक्कीच ऐकले असतील, पण हरियाणा सेक्टर 6 (Hariyana) मधील पंचकुल हॉस्पिटल (Panchkula Hospital) मध्ये एक विश्वास न बसण्यासारखा प्रकार घडला आहे. या हॉस्पिटलमध्ये एमआरआय (MRI)  करून घेण्यासाठी आलेल्या एका रुग्णाला एमआरआय सेंटर मधील कर्मचारी चक्क स्कॅनिंग मशीन मध्येच विसरले.  राम मेहेर (Ram Meher) असे पेशंटचे नाव असून ते 61 वर्षीय आहेत. मेहेर यांना एमआरआय स्कॅनिंग मशीन टाकताना एका बेल्टने बांधून ठेवण्यात आले, मात्र तपासणी झाल्यावर या सेंटरमधील कर्मचारी मेहेर यांना काढायचेच विसरून गेले. साहजिकच आतमधील वातावरणात मेहेर यांचा श्वास कोंडू लागला आणि त्यांनी बाहेर पडण्यासाठी धडपड सुरु केली. सुरुवातीला याचा फायदा झाला नाही मात्र काही वेळाने बेल्ट वरील तणाव वाढल्याने तो तुटला आणि मेहेर जीव वाचवून बाहेर पडले.

प्राप्त माहितीनुसार, मेहर यांनी या प्रकरणी एमआरआय आणि सिटी स्कॅन सेंटरच्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध अनेक आरोप केले आहेत. याकरिता थेट हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांच्याकडे तक्रार करत, ‘त्या मशीनमधून बाहेर येण्यास मला 30 सेकंदांचा उशीर झाला असता तरी माझा मृत्यू झाला असता,’ असे मेहेर यांनी म्हंटले आहे. तर दुसरीकडे, हॉस्पिटलच्या प्रशासनाने मेहेर यांचे आरोप साफ खोटे असल्याचे म्हंटले आहे, तसेच याप्रकरणी जबाबदारी घेण्यास ही हॉस्पिटल व सिटी स्कॅन सेंटरने नकार दिला आहे.

हॉस्पिटलच्या सिटी स्कॅन सेंटरच्या प्रमुखांनी याविषयी दिलेल्या माहितीमध्ये मेहेर हे श्चनिंग तपासणी दरम्यान अजिबात सहकार्य करत नव्हते असे म्हंटले आहे. एकूण 20 मिनिटांकरीता मेहेर यांना मशीनमध्ये ठेवण्यात आले होते. शेवटच्या तीन मिनिटांमध्ये कर्मचारी सर्व आकड्यांची तपासणी करणार होते. पण संपूर्ण दोन मिनीट शिल्लक असतानाच अस्वस्थ वाटू लागल्याने कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना बाहेर काढले. इतकेच नव्हे तर मशीन मध्ये ठेवले असतानाही मेहेर दर दुसऱ्या मिनिटाला हालचाल करत होते.तरीही काळजीपूर्वकरित्या त्यांची तपासणी सुरु होती जेव्हा त्यांना असहनीय झाले तेव्हा त्यांना कर्मचाऱ्यांनीच बाहेर काढले असेही सिटी स्कॅन सेंटरच्या प्रमुखांनी सांगितले.

दरम्यान, पोलीस याप्रकरणी तपास करत असून हॉस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर याविषयी अधिक माहिती मिळेल असा अंदाज आहे



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif