Earthquake in Karnataka and Jharkhand: कर्नाटकमध्ये हम्मी आणि झारखंड येथील जमशेदपूर येथे भूकंपाचे सौम्य धक्के

या भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिण पूर्व नोएडा येथे होते. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता रिस्टर स्केलवर 3.2 इतकी नोंदवण्यात आली.

Earthquake | (Photo Credits: Pixabay)

कर्नाटक (Karnataka) येथील हम्पी (Hampi) आणि झारखंड (Jharkhand) येथील जमशेदपूर (Jamshedpur) शुक्रवारी सकाळी भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरले. कर्नाटक येथील भूकंप (Earthquake) 4.0 तर झारखंड येथील भूकंप 4.7 रीस्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. झारखंड राज्यात भूकंपाचा केंद्र बिंदू जमशेदपूर होता. तर कर्नाटक येथील भूकंपाचा केंद्रबिंदू हम्पी येथे होता. भूकंपामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. घाबरलेले लोक घराबाहेर पडले. विशेष म्हणजे जमशेदपूर आणि हम्पी या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी भूकंप जाणवला. दोन्ही ठिकाणी सकाळी 6.55 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.

हम्पी आणि जमशेदपूर येथे भूकंपापूर्वी दोन दिवसच (बुधवार) आगोदर दिल्ली-एनसीआर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिण पूर्व नोएडा येथे होते. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता रिस्टर स्केलवर 3.2 इतकी नोंदवण्यात आली. गेल्या दीड महिन्यात दिल्ली एनसीआर येथे भूकंपाचे 11 वेळा झटके बसले आहेत. (हेही वाचा, Earthquake in Delhi-NCR: दिल्ली-एनसीआर परिसरात दीड महिन्यात 11 वेळा भूकंप, मोठ्या आपत्तीचे संकेत; बुधवारीही पुन्हा बसले धक्के)

ट्विट

ट्विट

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (एनसीए) ने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (एनसीए) ने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली एनसीआर येथे 12, 13 आणि 16 एप्रिल या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर मे महिन्यातही भूकंपाचे धक्के जाणवण्याचा घटनाक्रम कायम राहिला. 6, 10, 15 आणि 28 मे या दिवशी या ठिकाणी भूकंप जाणवला. प्रामुख्याने दिल्ली-फरीदाबाद एनसीआर मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर 29 मे या दिवशी पुन्हा दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू रोहतक होता. दरम्यान, या काळात राजस्थान राज्यात 4 आणि हिमाचल प्रदेश राज्यात 6 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. विशेष म्हणजे या भूकंपाची तीव्रता 2.2 ते 4.5 रिस्टर स्केल इतकी राहिली. या पेक्षाही अधिक तीव्रतेचा भूकंप आला असता तर मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असते.



संबंधित बातम्या