Gyanvapi Mosque: शिवलिंग कार्बन डेटिंगच्या अलाहाबाद न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती

या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 ऑगस्टला होणार आहे. तोपर्यंत ASI कार्बन डेटिंग करणार नाही.

Supreme Court | (Photo Credits: IANS)

ज्ञानवापी मशिदीत (Gyanvapi Mosque) सापडलेल्या शिवलिंगच्या वैज्ञानिक सर्वेक्षण (Scientific Survey of Shivling) मध्ये सुप्रिम कोर्टाने आज अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगचे आदेश दिले होते. परंतू ज्ञानवापी मशिद कमिटीने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आज त्यावर सुनावणी झाली असून आता पुढील आदेशापर्यंत त्याला स्थगिती देण्यात आली आहे.

वाराणसी न्यायालयाने यापूर्वी शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगला परवानगी नाकारली होती. त्यानंतर हा वाद अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये आला. अलाहाबाद न्यायालयाकडून वाराणसी न्यायालयाचा निकाल बदलून ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाचे कार्बन डेटिंग करण्याला परवानगी देण्यात आली होती. शिवलिंग किती जुने आहे यासाठी वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश अलाहाबाद न्यायालयाने दिले होते. ज्ञानवापी मशिदीतील ते शिवलिंग किती जुने आहे हे वैज्ञानिक सर्वेक्षणाद्वारे शोधावे लागेल, ते खरोखर शिवलिंग आहे की आणखी काहीतरी आहे याचाही शोध घेण्याचे आदेश अलाहाबाद न्यायालयाने दिले होते. पण आता या प्र्क्रियेला सर्वोच्च न्यायालयाने रोखले आहे. Gyanvapi Masjid Case: ज्ञानव्यापी मशिदीच्या तळघरात अजून अनेक शिवलिंग; मंदिराच्या माजी महंताचा दावा .

पहा ट्वीट

आपल्या अपीलमध्ये मुस्लिम पक्षाने कार्बन डेटिंगवर बंदी घालण्याची मागणी केली होती. याप्रकरणी आपली बाजू ऐकून घेण्यात आली नाही,असा त्यांचा दावा आहे. या याचिकेवर सुनावणी करताना आज सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 ऑगस्टला होणार आहे. तोपर्यंत ASI कार्बन डेटिंग करणार नाही.