गुजरात: अंबाजी येथे दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांची बस दरीत कोसळली, 18 जणांचा मृत्यू; नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला खेद

बनासकांठा (Banaskantha) येथील त्रिशूलीया घाटात (Trishuliya Ghat) ही बस कोसळली.

Bus Accident In Gujrat 18 Deaths (Photo Credits: ANI)

नवरात्रीच्या (Navratri) निमित्ताने गुजरात (Gujrat)  मधील प्रसिद्ध देवस्थान अंबाजी (Ambaji) येथे देवीचे दर्शन घेऊन परत येणाऱ्या भाविकांची एक बस कोसळून 18 जणांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. बनासकांठा (Banaskantha) येथील त्रिशूलीया घाटात (Trishuliya Ghat)  ही बस कोसळली, यावेळी बसमध्ये साधारण 70 भाविक होते, यापैकी 18 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरुवात केली. बचावपथकाने क्रेनचा वापरकरून मृतदेह दरीतून बाहेर काढले तर या अपघातात जखमी झालेल्याना जवळलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या दुर्घटनेबाबत ट्विटर च्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

बनासकांठा या परदेशात मागील एकही दिवसांपासून मुसळधार पाऊस होता, ज्यामुळे रस्ता निसरडा झाला असण्याची शक्यता आहे, मात्र अद्याप या अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही, पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Road Accident Near Nashik: नवस फेडून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला नाशिक मार्गावर भीषण अपघात, 4 जण ठार, 6 जण गंभीर जखमी

ANI ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत खेद व्यक्त करताना, "बनासकांठातून खूपच वाईट बातमी मिळाली. दुर्घटनेत मृत्युमुखी झालेल्या व्यक्तींप्रती मी अत्यंत दुःखी आहे. माझ्या संवेदना पीडितांच्या कुटुंबासोबत आहेत. स्थानिक प्रशासन मदत कार्य करीत आहे. जखमी झालेले सर्व लोक लवकरात लवकर बरे होवो, अशी मी प्रार्थना करतो अशा आशयाचे एक ट्विट केले आहे.

नरेंद्र मोदी ट्विट

दरम्यान, याप्रकरणी पोलीस तपास करत असून मृतांपैकी काहींची ओळख अद्याप पटलेली नाही.